India Languages, asked by gayathrisathyan3359, 10 months ago

Marathi Essay Ganesh Chaturthi

Answers

Answered by gkul760
0

Answer:

I could not understand the question

Answered by halamadrid
3

◆◆"गणेशचतुर्थी"◆◆

गणेशोत्सव किंवा गणेशचतुर्थी भारतात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध सण आहे.भाद्रपद महिन्यात येणारा गणेशचतुर्थी सण सगळे लोक उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.

गणेशचतुर्थीत गणपतीच्या मूर्तीची स्थापना घरात केली जाते.या मूर्तीचे रोज पूजन केले जाते,नैवैद्य दाखवले जाते,मूर्तीला सजवलेल्या मखरात ठेवले जाते.

सकाळ संध्याकाळ गणेशाची आरती केली जाते,आरतीसाठी लोक एकत्र येतात.आरतीनंतर सगळ्यांना प्रसाद दिले जाते.

सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव गल्लीत व विभागात साजरा केला जातो.सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी लोकांमध्ये एकता वाढावी यासाठी केली होती.

गणेशोत्सवामध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. दीड,पाच,सात,अकरा किंवा एकवीस दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

गणेशोत्सवात घरी किंवा आजूबाजूच्या परिसरात प्रसन्नतेचे वातावरण असते. या सणानिमित्त लोक एकमेकांच्या घरी जातात.सार्वजनिक गणेशोत्सवात मनोरंजक कार्यक्रम ठेवले जातात.

असा हा गणेशोत्सवाचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो.

Similar questions