Marathi Essay Hasat Khelat Shikshan
Answers
Answer:
sorry I didn't know what you ask
◆◆हसत खेळत शिक्षण◆◆
"हसत खेळत शिक्षण", ही किती सुंदर कल्पना आहे ना!आजकल बऱ्याच शाळांमध्ये शिकवण्याची ही नवीन पद्धत वापरली जात आहे.अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीत वेगवेगळ्या तऱ्हेने,विद्यार्थ्यांना एखादा विषय समजवला जाऊ शकतो.
एखाद्या नाटकाच्या मदतीने,नृत्याच्या मदतीने,संगीत किंवा प्रत्यक्ष कृतीच्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवतात.शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतात,त्यांच्या शंका ऐकून घेतात आणि त्यांच्या शंकांचे योग्य ते उत्तर देतात.
अशा वेगळ्या प्रकाराने अभ्यास शिकवल्यामुळे मुलांना एखादा विषय चांगल्या प्रकारे समझतो.
आजकल शिकवण्याची पद्धत बदलत चालली आहे आणि ही आताच्या काळाची गरज आहे,कारण पारंपरिक पद्धतीने शिकवल्यामुळे मुले कंटाळतात,तसेच त्यांना अभ्यासाचा ताण जाणवतो.
मुलांनी कधीकधी अभ्यास न केल्यामुळे शिक्षक त्यांना मारतात,त्यांची अशी वागणूक खूप वाईट आहे,जर हसत खेळत शिकवण्याची पद्दत प्रत्येक शिक्षकाने वापरली तर शिक्षण कोणालाच कांटाळवणा वाटणार नाही आणि सगळेजण आनंद घेऊन अभ्यास करतील.