India Languages, asked by Nireesha9660, 1 year ago

Marathi Essay Ganesh Festival

Answers

Answered by lokeshbisht2017
1

Answer:

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे.[१] भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकजागृती करून घेण्यासाठी या उत्सवाचा प्रभावीपणे अवलंब करण्यात आला महाराष्ट्रात या सार्वजनिक गणेशोत्सवाला खूप मोठी लोकप्रियता लाभली. [२] ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच़े आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच़े आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते,व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.

Answered by Hansika4871
1

" Ganesh Festival "

भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात. हा सण अकरा दिवसांचा असून काही ठिकाणी २१ दिवसांचा हे करतात. या सणाचं महत्त्व ही दीड दिवसाच्या गणपतीपासून ते पाच दिवसाचा गणपती, सहा दिवसाचा गौरी गणपती ,सात दिवसाचा गणपती आणि नंतर अकरा दिवसांचा गणपती अशा पद्धतीने गणपतीचे विसर्जन केलं जातं.

हा उत्सव महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केला , त्या मागचा उद्देश एवढाच होता की समाज जागृती व्हावी ,लोक एकमेकांच्या घरी जाऊन आनंद सोहळा साजरा करू द्यावेत, आणि जनजागरण होण्यासाठी त्यावेळी लोकमान्य टिळकांनी हा सण स्थापन केला आणि पुढे महाराष्ट्रात तो वाढीस लागला.

सांस्कृतिक असलेल्या या सणाचे महत्त्व असं की या दिवसात एक मंगलमय वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं .बाप्पाच्या आशीर्वादासाठी जे भक्त जण असतात भक्तगण असतात ते या दिवसात देवाची आरती करतात देवाला मनोभावे आपल्या मनातले विचार मांडून त्याच्या पायी नतमस्तक होतात आणि बाप्पा साठी गोडधोड पदार्थ बनवतात.एकमेकांकडे गणपतीला जाण्याने एकमेकांकडे चा आनंद द्विगुणित होतो यामध्ये आचार-विचार यांचा प्रधान होतं.

असा हा सण खूप रम्य असतो.

Similar questions