Hindi, asked by HELPMEPLZ1, 1 year ago

Marathi essay on Christmas

Attachments:

Answers

Answered by yashvir101yashvir
2
नाताळ हा मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जाणारा सण आहे. काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
या सणात एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्र्परांचे अभिनंदन करण्यात येते. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट (नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जातेनाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात.
२१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.
जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.
जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.
काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रुजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी ' मित्र ' असे आहे.
आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला किंवा जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे.
वर्षातील सर्वांत तेजस्वी अशा पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येला दीपोत्सव साजरा करून आपणही जणू अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची तळमळच व्यक्त केली आहे. आश्विन कृष्ण अमावास्येला दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याला, नव्या विक्रम संवताच्या नवीन सूर्याला आपण सर्वजण पिढ्यान्पिढ्या वंदन करीत आलो आहोत.
धर्म आणि धर्मदैवते वेगळी असली तरी सर्व जगावर सोनेरी किरणांची खैरात करणारा आणि अखिल विश्वाचा जणू आत्माच असलेला सूर्य मात्र उभ्याआडव्या अनंत आभाळात एकच.
Answered by janhavi5350
1

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.[३][४] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[५] जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.[६] त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

२५ डिसेंबर : नाताळ (क्रिसमस)

वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि अॅना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपंण्यास अवकाश होता. पुरेश्या वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.

योगायोगाने त्याच वेळी सीझर आॅगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठयात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतानी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेढपाळानी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले. तर हेरोद राजाचे धाबे मात्र दणाणले. अशा प्रकारे कितीतरी वर्षापूर्वी विविध भविष्यवाद्यांनी जुन्या करारात केलेले भाकीत पूर्ण झाले. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. (यशया : ७:१४). यहुद्यांच्या वंशास तारणारा जन्मास येईल. (उत्पत्ती : ४९:१०) तो दाविदाच्या घराण्यात जन्म घेईल. (येहेज्केल : ३४:२३). ख्रिस्तजन्मापूर्वी (इ. सन. ५०० वर्ष आधी) मिखा भविष्यवाद्याने देखील हेच भविष्य सागितले होते. (मिखा ५:२)

“क्रिसमस” किवा “ नाताळ” हा सण प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मुळीच अस्तित्वात नव्हता. खरे पाहता पूर्वी येशूजन्माचा उत्सव मागी लोकांच्या आगमनापर्यंत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई. पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ. सन ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली. परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठे होऊ लागतात. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत.

कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली. असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५मध्ये आढळतो.'

Similar questions