Marathi Essay On Earth
Answers
धरित्री
सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये आपली पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन जगणे शक्य आहे म्हणून "धरणी स्वर्ग आहे" असे संबोधित केले जाते. आपले शास्त्रज्ञ पृथ्वीवरील गूढ रहस्य सोडविण्यासाठी प्रयन्त करत आहेत. तर चला मग जाणून घेऊया पृथ्वी बद्दल अशी काही माहिती ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल.
१. या पृथ्वी वरील माणसांपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू एक चमचाभर मातीमध्ये असतात.
२. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे.
३. आपल्या आकाशगंगेत जवळजवळ २ अरब पृथ्वी सारखे ग्रह आहेत असे शास्त्रा्यांचा अंदाज आहे.
४. पृथ्वीच्या आतील भागातील तापमान सूर्याच्या तापमाना एवढे असते.
५. सुरवातीच्या काळात योग्य ज्ञान नसल्यामुळे पृथ्वी सपाट आहे असे मानले जात होते.
६. सूर्यमाले मधील पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे जिथे पाणी तीन रुपात उपलब्ध आहे - द्रव, वायू आणि घन.
७. मागील ४० वर्षामध्ये पृथ्वीवरील जवळ जवळ ४०% प्राणी नष्ट झालेले आहेत.
८. सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे पूर्ण सूर्य-ग्रहण होते.
९. सूर्य १९ लाखांपेक्षा जास्त पृथ्वी आपल्या आतमध्ये सामावून घेऊ शकतो.
१०. एका दिवसात २४ तास नसून २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंद असतात. हा तो वेळ आहे ज्या मध्ये पृथ्वी, सूर्या भोवती एक चक्कर लावायला लावते.
११. आपण सतत सूर्याभोवती १,०७,१८२ कि.मी. प्रती तास या वेगाने फिरत आहोत.
१२. प्रत्येक वर्षी पृथ्वी वर जवळजवळ ५ लाख भूकंप येतात. त्यापैकी केवळ १ लाख भूकंप च समजून येतात आणि त्यातील सुद्धा १०० भूकंप हे धोकादायक ठरतात. बाकी भूकंप एवढे छोटे असतात कि आपल्याला कळात सुद्धा नाही.
१३. पृथ्वीच्या आतल्या भागात एवढा सोन आहे कि पृथ्वीची पूर्ण पृष्ठभाग सोन्याने झाकला जाऊ शकतो.
१४. २०१५ हा इतर वर्षांच्या तुलनेत एक सेकंद जास्त मोठा होता कारण पृथ्वीचे परिभ्रमण थोड्या धीम्या गतीने झाले होते.
१५. पृथ्वीचा ४०% भाग तर ६ देशांनी व्यापलेला आहे. (रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, चीन आणि अमेरिका)
१६. जर चंद्र नसता तर पृथ्वीचा दिवस ६ तास जास्त मोठा असता.
१७. पृथ्वीवरील ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे परंतु पृथ्वी वरील फक्त १% च पाणी पिण्यायोग्य आहे.
१८. चिली मधील अटाकामा हे पृथ्वीवरील कोरडे ठिकाण आहे. जेथे आतापर्यंत कधी पाऊस पडला नाही आहे.