India Languages, asked by satishsatish9455, 9 months ago

Marathi Essay On House

Answers

Answered by halamadrid
1

◆◆"घर"◆◆

घर वेगवेगळे प्रकारचे असतात. कोण इमारतीत राहतो,तर कोण बंगल्यामध्ये,तर कोण झोपद्यांमध्ये राहतो.

प्रत्येकाला त्याचे घर खास वाटत असते.

घर ती जागा असते, जिथे आपण आपल्या परिवारासोबत राहतो.घरात आपण आपल्या कुटुंबासोत आनंदाचे व सुखाचे क्षण घालवतो.

घर कसा ही असो,त्याला घरपण त्यात राहणाऱ्या लोकांमुळे येतो.घरात जो सुख आणि आनंद मिळतो.तो जगात इतर कोणत्याही जागेवर मिळत नाही.

आपण फिरण्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या ठिकाणी जातो,परदेशी जातो,मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतो,पण

थोड्या दिवसांनी प्रत्येकाला घराची आठवण येतेच.

आपल्या घरात आपल्याला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटते.तिथे आपल्याला मनाची शांति,आराम,स्वातंत्र्य मिळते.घरात आपल्याला कोणाचीही भीती न बाळगता,आपल्याला जसे हवे तसे आपण वागू शकतो.

घर लहान असो किंवा मोठे ते महत्वाचे नाही,घरातील कुटुंब एकत्र असले पाहिजे.घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आनंदी असले पाहिजे,तेव्हा त्या घराला शोभा येते.

Similar questions