Marathi essay on science a boon or curse *Marathi language*
Answers
Answer:
आताचे काळ हे विज्ञानाचे आहे.विज्ञानामुळे आपण विविध क्षेत्रांमध्ये खूप प्रगती केली आहे.विज्ञानाच्या विविध आविष्कारांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला जातो.त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते.विज्ञानामुळे आविष्कार झालेले 'यंत्र',यांचा आपल्या जीवनात महत्वाचा स्थान आहे.
विविध यंत्रांच्या शोधामुळे आपले जीवन सुविधाजनक आणि वेगवान बनले आहे.आज आपण संगणक आणि मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या काम करू शकतो,जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो.टीव्हीमुळे आपल्याला देशातील विवध घडामोडी लगेच समझतात.एका जागेवरुन दुसऱ्या जागी आपण गाडीच्या सहाय्याने काही वेळातच जाऊ शकतो.
आपल्या कामासाठी आपण यंत्रांवर फार अवलंबून असतो,ज्यामुळे आपण खूप आळशी बनत चाललो आहोत,आपली हालचाल कमी झाल्यामुळे आपल्या आरोग्यवर प्रभाव पडतो.औद्योगीकरण वाढवण्यासाठी मनुष्याने निसर्गाचा तालमेल बिघडवला आहे.काही लोकं सोशल मीडियाचा गैरवापर करतात,ज्यामुळे समाजात हिंसा,गुन्हे वाढतात.
अशा प्रकारे,विज्ञानाचे फायदे तसेच तोटे सुद्धा आहेत.आता हे आपल्यावर आहे की आपण त्याचा शाप की वरदान म्हणून वापर करतो.
Explanation: