Marathi poem , Tifan ki Rasasgrah
तिफन कविता
Answers
Rasgrahan is appreciation in English
कवितेचे नाव- तिफन
कवितेचे कवी- मराठी भाषेतील अतिशय सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ हे या कवितेचे कवी आहेत.
काव्यप्रकार- महाराष्ट्रामधील बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलीभाषांपैकी एक बोलीभाषी असणाऱ्या विदर्भ या भाषेत ही कविता लिहली गेली आहे.
कवितेचा विषय -शेतकरी हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून पेरणी करत असताना शेतकरी व त्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती असते व शेतकरी हा शेतात कशा पद्धतीने राबत असतो याविषयी माहिती दिली आहे पेरणी करत असताना त्याला अनेक अडचणी येतात परंतु तो कुठलाही अडचणींना बळी पडत नाही.
कवितेची मध्यवर्ती कल्पना- प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवी विठ्ठल वाघ यांनी एका शेतकऱ्याचे कष्टमय जीवन व परिस्थितीची होत असलेला सामना या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे कितीही संकटे आले तरी अतिशय सक्षमपणे त्या संकटांना तोंड देण्याची ताकद शेतकऱ्यात असते मुल रडत असले किंवा पायात काटा रुतला जरी असला तरी त्याचा शेतकऱ्यावर काहीही परिणाम होत नाही तो अतिशय धैर्याने आपले काम करत असतो.
कविता आवडण्याचे कारणे-
प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा संघर्ष कवीने लोकांसमोर मांडलेला आहे कितीही संकटे आले तरी आपल्या ध्येयापासून दूर जायचे नाही हा संदेश कवीने या कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे.
रसग्रहणाबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/36793671
https://brainly.in/question/20055241
#SPJ2