mathrubhumi essay in Marathi
Answers
■■ माझी मातृभूमि■■
भारत ही माझी मातृभूमि आहे आणि मला माझ्या मातृभूमिवर म्हणजेच माझ्या भारत देशावर खूप अभिमान आहे.
माझा देश खूप मोठा आहे.इथे खूप विविधता आहे.माझ्या देशात डोंगरदऱ्या आहेत,मोठमोठ्या नद्या आहेत.इथे वाळवंट आणि जंगलेही आहेत.माझ्या देशात काही भागांमध्ये पाऊस पडतो,तर काही भागांमध्ये बर्फ पडतो.
माझ्या देशात वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात.इथे विवध सण आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.इथे वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक राहतात.इतकी विविधता असून ही माझ्या देशात एकता आहे.
प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवस हे माझ्या देशाचे राष्ट्रीय सण आहेत.जनगणमन हे राष्ट्रगीत आहे.तिरंगा हा माझ्या देशाचा राष्ट्रध्वज आहे.
माझ्या देशाला थोर संत,महापुरुष लाभली आहेत.भारताने प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.आज जगभर माझ्या देशाला ओळखले जाते.
मला माझ्या मातृभूमिवर खूप खूप प्रेम आहे आणि भारतीय होण्याचा खूप अभिमान आहे.