Computer Science, asked by chinnu2947, 9 months ago

Most heart touching essay on shetkari in Marathi

Answers

Answered by megha200515
0

Answer:

if u'll tell me the meaning of shetkari then only I'll be able to help you

Answered by halamadrid
1

■■"शेतकरी"■■

शेतकरी म्हणजेच "अन्नदाता", हा सगळ्यात महत्वाचे काम म्हणजेच अन्न पिकवण्याचे काम करतो.शेतकऱ्याचे काम खूप काष्टाचे असते.

शेतकरी दिवस रात्र शेतात राबून आपल्यासाठी अन्न पिकवत असतो.इतकी मेहनत करून सुद्धा त्याला कधीकधी त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.

कमी किंवा जास्त पावसामुळे शेतात पिकवलेल्या धान्याची नासाडी होते. शेतकऱ्याला कधीकधी पैशांच्या गरजेपायी कमी पैशांमाध्ये आपले पीक विकावे लागते.काही शेतकरी कर्ज न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करतात.

शेतकरी, चांगली नोकरी करून सुख सुविधा असणारे जीवन जगण्यापेक्षा परिश्रमाचे जीवन निवडतो.आपल्या देशात काही पैशांसाठी शेतकऱ्याला त्याचे जीव गमवावे लागते. बऱ्याच वेळा आपण शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ऐकतो. या बातम्या ऐकून शेतकऱ्यांसाठी फार वाईट वाटते व आपले डोळे अक्षरशः पाण्याने भरून जातात.

शेतकऱ्यांचे जीवन खूप कष्टदायी असते.म्हणून शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे व त्याने पिकवलेले अन्न वाया नाही घालवले पाहिजे.

Similar questions