निबंध लेखन
नदीचे आत्मवृत्त
Answers
Step-by-step explanation:
रोजच्या प्रमाणे मी खळखळ वाहत होते. काठावर खूप गर्दी होती. एक मुलगा माझ्या अंगावर खेळण्यास आला. त्याच्या आई ने त्याला दटावले. तेंव्हा त्याचे वडील म्हणाले “अग, जाऊदे त्याला. नदी आपली माता आहे. त्याला गोदामातेला कडकडून भेटू दे.” तेंव्हा एकदम मला माझे बालपण आठवले. अशीच मी बाबांच्या कडेवरून उडी मारून निघाले होते.
तेंव्हा धरणी माता अशीच ओरडली होती. पण पर्वतराज सह्याद्री ,माझे बाबा म्हणाले “जाऊ दे तिला. पाहू दे जग” आणि मी सुसाट धावत सुटले. ती आले इथे नासिकला रामकुंडावर. तेंव्हा पासून मी अविरत वाहते आहे, मानवाच्या कल्याणासाठी. इथेच मला दक्षिण गंगा असे नाव लोकांनी दिले.
पण खरी मी गौतमी ! हे नाव गौतम ऋषींनी दिले कारण त्यांचे गोहत्येचे पाप नष्ट व्हावे म्हणून तर माझा जन्म झाला, नाहीतर स्वर्गात मी सुखात होतेच की. हा विचार करता करता माला माझे बालपण आठवले.
मी मूळची त्र्यंबकेश्वराची. ब्रह्मगिरी माझे बाबा. ब्रह्मकुंडात माझा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकराच्या जटेतून मी अवतरले. आणि गौतम ऋषी शापमुक्त झाले. आणि मी तेथे लहानाची मोठी झाले. मी खूप अवखळ होते. सारखी उड्या मारायचे. पण माझे बाबा मला शंकराचा धाक दाखवायचे. कारण तेथेच शंकराचे धगधगते रूप होते. त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. मग मी पळत खाली आले.
सगळी लोकांचे जीवन माझ्याशी निगडित आहे. मी त्यांची आई आहे हे खूप चांगले वाटते. माझ्या जीवनाला पूर्णता येत नाही असे मला वाटले. .खूप लांबचा प्रवास करून बंगाल च्या उपसागरास माझ्या जोडीदारास भेटले. आता मी अवखळ नव्हते, रौद्र नव्हते, कृश नव्हते. माझे काहीच अस्तित्व नव्हते. मी पूर्णपणे विरघळून गेले होते. असेच असते ना समर्पण? माझे मीपण कुठेच नव्हते
पण मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते की माझ्या चांगल्या पाण्यात लोक घाण टाकतात. मला गलिच्छ करतात. मी इतके त्यांचे चांगले करते,पण ते माझा श्वास गुदमरला इतकी घाण, फुले, कचरा, आणि सांडपाणी टाकून मला प्रदूषित करतात. तेच पाणी पिऊन मग रोगराईने त्रस्त होतात.
त्यांना हे काळात नाही की मी वाहत राहिले तरच त्यांना चांगले पाणी मिळेल. त्यांना कोण सांगणार? मी मूकपणे सहन करते. आणि माझ्या बाबांकडे, आणि शंकराकडे विनवणी करते की त्यांना समजूत येऊ दे नाहीतर माझा संयम संपला तर ह्यांचाच सर्वनाश होईल.
देवा, हि वेळ माझ्यावर आणू नको.