निबद्यलेखन
मोबाईलचे फायदे
व तोटे.
Answers
✨..Hope this will helps uhh..✨
Answer:
Explanation:
मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम
मोबाइल चे फायदे
१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।
२)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।
३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।
४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।
५) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता । मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत किंवा मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो ।
यांसारखे अनेक मोबाइल चे फायदे असले तरी देखील ह्या आपल्या आवडीच्या उपकरणाचे तोटे / दुष्परिणाम देखील आहेत ।
मोबाइल चे तोटे / दुष्परिणाम
१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे । पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत । हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे ।
२) शाळा कॉलेज मधील मुले मोबाईल चा गैरवापर करताना पाहायला मिळते । मुले शाळेत तासाला बसून मोबाईल चा वापर करतात । ह्या मुळे मुलां मध्ये आत्मकेंद्री पणा वाढताना दिसत आहे ।
३) मोबाईल मुळे वेळेचा अपव्यय होतो । सरकारी कर्मचारी म्हणा किंवा खाजगी कर्मचारी हल्ली सगळ्याच लोकांकडे मोबाईल असतो हे लोक कामाच्या ठिकाणी मोबाईल वर टाईमपास करताना पाहायला मिळतात ।अशा कार्यालयात मोबाईल बंदी गरजेची आहे ।
४) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते । अनेक लोकांना गाडी लावताना मान वाकडी करून मोबाईल वर बोलण्याची सवय असते अशा सवयी मुळे ही लोक स्वतः बरोबरच समाजातील इतर लोकांच्या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात ।
५) बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंग ला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्यांचा विस्फोट होऊ शकतो आणि वापरकर्त्यास मोठी ईजा होऊ शकते । त्यामुळे अशा पद्धतीने मोबाईल वापरणे शक्यतो टाळावे ।