नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र पर निबंध इन मराठी
Answers
Answer:
nehru bhartacha shodh
Answer:
Step-by-step explanation:
नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र पर निबंध
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील ⇨ मोतीलाल नेहरू एक नामांकित व राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी पैसा व प्रतिष्ठा मिळविली होती. जवाहरलालांची आई स्वरूपराणी धार्मिक वृत्तीची होती. आईकडून आणि मावशी बिबीअम्माकडून जवाहरलालादी मुलांना रामायण–महाभारतातील कथा आणि सदाचाराची शिकवण यांचा लाभ झाला. मोतीलाल यांना अनिष्ठ रूढी व धार्मिक बाबतीत फारशी आस्था नव्हती. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. त्यांपैकी फर्डिनांट टी ब्रुक्स या शिक्षकाने जवाहरलालांमध्ये विज्ञानाची व वाचनाची आवड निर्माण केली. शिवाय ब्रुक्स स्वतः थिऑसॉफिस्ट आणिॲनी बेंझट यांचे शिष्य होते. त्यामुळे जवाहरलाल यांच्या कोवळ्या मनावर काही काळ थिऑसॉफीचा प्रभाव होता. त्यांचे मन प्राचीन धर्मग्रंथांकडे आकृष्ट झाले. त्यांनी उपनिषदे, भगवद्गीता, महाभारत, रामायण यांचे वाचन केले. पंडितजींचे एकूण बालपण काहीशा संमिश्र सांस्कृतिक वातावरणात पार पडले घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशी यांचे पारंपारिक संस्कार, उत्तर भारतीय उच्च वर्गांत टिकून राहिलेल्या खानदानी, मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आणि वडिलांकडून लाभलेला अनिष्ठ सामाजिक रूढींबद्दलचा बंडखोरपणा इ. कारणांनी व आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाने पंडितजींचे मत कोणत्याही एकान्तिक विचारधारेपासून अलिप्त राहिले व त्यास एक उदार सहिष्णू वळण लागले.
शिक्षण :
घरी प्राथमिक तयारी झाल्यानंतर जवाहरलाल पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले(१९०५). इंग्लंडमधील हॅरो या प्रसिद्ध विद्यालयात दोन वर्षे शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ट्रिनिटी महाविद्यालयात (केम्ब्रिज विद्यापीठ) ते दाखल झाले (१९०७). हॅरो येथे असताना त्यांना बक्षिस म्हणून ट्रीव्हेल्यन लिखित गॅरिबॉल्डीच्या चरित्राचा एक भाग मिळाला. या चरित्राचे इतर खंडही त्यांनी मिळविले. काव्हूर, मॅझिनी व गॅरिबॉल्डी यांप्रमाणे आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करावे, अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. यावेळी भारतात वंग-भंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केंब्रिज
स्वातंत्र्य चळवळीतील कार्य :
जवाहरलाल १९१२ मध्ये शिक्षण संपवून भारतात परत आले. काही काळ वकिली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांचे मन रमले नाही. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना राजकारणात आस्था वाटू लागली होती. या काळात त्यांनी पुष्कळ वाचन केले. लौ. डिकिन्सन व मेरिडिथ टाऊनझेंड या ग्रंथकारांच्या विचारांचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला. इंग्लंडमधून वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नांबद्दलची तळमळ दिसून येते. भारतात परतल्यानंतर त्यांची पहिली काही वर्षे तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात गेली. मवाळांचे नुसत्या भाषणांवर भर देणारे राजकारण त्यांना पसंत नव्हते पण