Hindi, asked by harshvardhansidam, 9 months ago

नामाचे प्रकार लिहून ते सोदाहरण स्पष्ट करा​

Answers

Answered by bestanswers
64

नामाचे प्रकार लिहून ते सोदाहरण स्पष्ट करा .

नामाचे तीन मुख्य प्रकार आहेत.  

1.सामान्य नाम - एकाच जातीच्या पदार्थाला त्याच्या समान गुणधर्मामुळे विशिष्ट नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात.

उदा. मुलगा, मुलगी, शिक्षक, शाळा, दूध, शेतकरी इ.  

2.विशेष नाम - हे नाम व्यक्तिवाचक असते. त्यातून विशिष्ट व्यक्ती, प्राणी वा वस्तू यांचा बोध होतो.

उदा. राम, मुंबई, गंगा, मोती इ.  

3.भाववाचक नाम - ज्या नामातून व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यातील गुणधर्म आणि भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात.

उदा. उत्तम, अप्रतिम, दुःख,  वाईट इ.

Answered by ItzAshleshaMane
9

Answer:

एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात.

नामाचे प्रकार :-

१. सामान्य नाम.

२. विशेष नाम

३. भाववाचक नाम

१. सामान्य नाम :-

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय.

उदा० मुले, मुली, शाळा, पुस्तक, इत्यादी.

२.विशेष नाम :-

जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.

उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.

३.भाववाचक नाम :-

ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा० आनंद, दु:ख, इत्यादी.,ई.

Explanation:

Hope it will help you..

Similar questions