निर्जंतुकीकरण म्हणजे काय
Answers
☛ निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीव (उदा., विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक व कवक-बीजाणू हे सर्व)
☛ म्हाला माहीतच आहे की जीवजंतू साध्या डोळ्याने दिसत नाहीत.
Answer:
सूक्ष्मजीव/ विषाणू किंवा जीवाणू नष्ट करण्याची पद्धत म्हणजे निर्जंतुकीकरण होय.
सूक्ष्मजीव हे पृष्ठभागावर, औषधांमध्ये किंवा वृद्धिमिश्रणामध्ये देखील असू शकतात. अनेक पद्धतींनी निर्जंतुकीकरण केले जाते.
अन्न टिकवून ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया करताना जी उपकरणे लागतात तेसुद्धा निर्जंतुक केली जातात.
शरीरावर होणाऱ्या जखमेचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. निर्जंतुकीकरण यामुळे रोगजन्य संक्रमण हे टाळता येते. निर्जंतुकीकरणांमध्ये सूक्ष्म जिवांना नष्ट केले जाते.
निर्जंतुकीकरणासाठी रसायने, विकिरण पद्धत, उष्णता, या पद्धतींचा वापर केला जातो. जंतुनाशक साबणाने हात स्वच्छ धुऊन सूक्ष्मजीवांचा नायनाट करता येतो.