nibandh on prasangavadhan
Answers
Explanation:
रामदादाच्या वाटणीला एक छोटंसं शेत आलं होतं. त्याने शेतावरच एक टुमदार झोपडं बांधलं होतं. तिथे त्याची बायको, दोन मुलं, गाय, शेळी, बैल असा परिवार होता. मुलगी कमला पहिलीत तर मुलगा रमेश तिसरीत होता. दोघं भावंडं अतिशय हुशार होती. कधीच शाळेला दांडी मारत नसत. सोबत टॉमी हा कुत्राही असे. तो या भावंडांना शाळेत सोडून परत घरी येत असे. शाळेच्या सुरुवातीचे दिवस होते. पावसाळा होता. शेतीच्या कामाला वेग आला होता. सकाळचे दहा वाजत होते. दोघं बहिण भाऊ हसतखेळत शाळेत चालले होते. सोबत टॉमीही होता. तितक्यात त्यांना समोरच्या शेताच्या बांधावर आपल्या म्हशीला पाणी पाजणारी सखूआजी दिसली. तिला हाक मारून दोघं पुढे जातात इतक्यात 'मेले गं मेले' असा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं तर सखू आजीला तिच्या म्हशीने ढुशी दिली होती आणि म्हैस पळाली होती. आजी आता विहीरीत पडली होती. विहिरीत फारसं पाणी नव्हतं. नुसते दगड होते. आजी त्या दगडांवर पडून रक्तबंबाळ झाली होती. दोघंही घाबरून गेले. काय करावं? कुणाला बोलवावं? त्यांना कळेना. विहिर खूपच खोल होती. टॉमीही सैरभैर होऊन भुंकत होता. कमलाला तिथेच थांबायला सांगून रमेश गावाकडे धावत सुटला. आपल्या लहानश्या पावलांनी गावाकडे धावताना तो ओरडत होता, अरे वाचवा, सखू आजी विहिरीत पडली. तो आवाज ऐकून लोकं धावत आले. त्यांनी आजीला सुखरुप बाहेर काढलं. दवाखान्यात नेलं. गावकऱ्यांनी दोघांचं खूप कौतुक केलं. शाळेतही ही घटना कळल्यावर गुरुजींनीही मुलांचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर शेतावर जाऊन रामदादा आणि त्याच्या पत्नीकडे या दोघांचं कौतुकही केलं.