ऑनलाईन शिक्षणाविषयी तुमचे विचार सांगा
Answers
कोव्हिड१९ ने सर्वच क्षेत्रांपुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले आहेत. त्यास शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्रे सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे, अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची हीच वेळ आहे. पण, प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का?
मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात. घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने ‘घरून शिक्षण’ (लर्न फ्रॉम होम) या संकल्पनेचं काय होईल, ती यशस्वी ठरेल का, अशा शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. मोबाइलचेच उदाहरण घ्या ना. मोबाइल घेऊ नको, असं कितीही बजावून सांगितले तरी ते या ना त्या कारणाने मोबाइल डोळ्यासमोर धरतातच. याला सध्याच्या परिभाषेत ‘स्क्रीन टाइम’ असे म्हटले जाते. स्मार्टफोन आणि स्क्रीन यांच्यापासून लहान मुलांना फार काळ दूर ठेवणे शक्य होत नाही. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या लहानग्यांना या स्क्रीन टाइमपासून कसं भरकटवायचे हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.
ANSWER
ऑनलाइन शिक्षण शिक्षक आणि विद्यार्थ्याला त्यांच्या स्वतःच्या शिकण्याची गती सेट करण्यास सक्षम करते आणि सेट करण्याची अतिरिक्त लवचिकता आहे प्रत्येकाच्या अजेंड्यावर बसणारे वेळापत्रक. परिणामी, ऑनलाइन शैक्षणिक प्लॅटफॉर्म वापरल्याने काम आणि अभ्यास यांचा चांगला समतोल साधता येतो, त्यामुळे काहीही सोडण्याची गरज नाही.
PLEASE MARK ME AS BRAINLIEST.