CBSE BOARD X, asked by moghesmita83, 10 months ago




३) पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा.
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
4)फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते- या वाक्यपंक्तीतील विचारसौदर्य स्पष्ट करा.

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

३. दिलेल्या काव्यपंक्ती या आकाशी झेप घे रे या जगदीश खेबुडकर यांच्या कवितेतील आहेत.

खेबुडकर आपल्या कवितेच्या माध्यमातून कष्ट करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात.

आपले विचार स्पष्ट करत असताना एका पक्षाचे उदाहरण देतात काय म्हणतात ती पक्षाला परमेश्वराने म्हणजे भगवंताने पंख दिले आहेत त्या पंखांचा वापर मनसोक्तपणे आकाशात विहार करण्यासाठी केला पाहिजे. म्हणजेच परमेश्वराने जे आपल्याला कलाकौशल्य दिलेला आहे त्या कला कौशल्याचा पुरेपूर वापर करून आपल्यातील क्षमता सिद्ध केले पाहिजे व आपल्याला सोपवलेले काम पूर्ण केले पाहिजे असे कवी म्हणतात.

४. दिलेल्या काव्यपंक्ती या देखील कवी जगदीश खेबुडकर यांच्या 'आकाशी झेप घे रे' या कवितेतील आहेत. कवी स्व-कष्टाचे महत्त्व सांगत असताना, ते म्हणतात, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.आपण जर आळस केला तर आपण ठरवलेले ध्येय ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहीत असते, तरीदेखील आपण आळस करत असतो.

कवी म्हणतात, की आपल्याला सर्व कळते परंतु आपल्याला वळत नाही म्हणजेच सर्व कळत असून देखील आपण काही गोष्टी करत नाही हा निव्वड आपला आळस आहे ज्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही.

त्यामुळे प्रत्येकाने कष्ट करुन आपले ध्येय साध्य केले पाहिजे असे कवी म्हणतात.

Similar questions