पुढील प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे दिली आहे. त्यांपैकी योग्य पर्याय निवडा.
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?
(A) 132 चौसेमी
(B) 132 सेमी
(C) 42 सेमी
(D) 21 चौसेम
Answers
Answered by
3
या प्रश्नाचे उत्तर,म्हणजेच वर्तुळाचे परीघ १३२ सेमी इतके आहे.
दिलेल्या प्रश्नानुसार,वर्तुळाचे क्षेत्रफळ १३८६ चौसेमी आहे.
प्रश्नानुसार आपल्याला वर्तुळाचे परीघ शोधायचे आहे.
वर्तुळाचे परीघ शोधण्याचे सूत्र= २πr
इथे,आपल्याला π ची वैल्यू माहित आहे,पण r ची वैल्यू माहित नाही.
पण, प्रश्नात वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे,त्यावरून r ची वैल्यू शोधता येईल.
प्रश्नानुसार,वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच,
πr² = १३८६ चौसेमी.
२२/७ ×r² =१३८६
r² =१३८६×७/२२
r² = ४४१
तर, r =२१
आता, वर्तुळाचे परीघ काढता येईल.
वर्तुळाचे परीघ म्हणजेच,
२πr= २×२२/७ × २१
= ४४/७ × २१
= १३२ सेमी.
वर्तुळाचे परीघ १३२ सेमी आहे.
Similar questions