पुढील संकल्पना स्पष्ट करा: नकाराधिकार
Answers
Answered by
73
★ उत्तर - नकाराधिकार :एखाद्या महत्त्वाच्या
प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला 'नकाराधिकार'असे म्हणतात.सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात.सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे गरजेचे असते.कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले; तरी तो निर्णय अमान्य होतो. अमेरिका, रशिया, इंग्लड,फ्रान्स व चीन हे या सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत.
धन्यवाद...
Similar questions