पुढे दिलेल्या शीर्षकावर आधारित कथालेखन करा.
(शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ)
Answers
Answer:
लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली. राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला. जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या साऱ्याने वातावरण आगदी प्रसन्न झालं.
Explanation:
लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली. राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला. जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या साऱ्याने वातावरण आगदी प्रसन्न झालं. अनेक देशो-देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र राजदरबारात उपस्थित झाले. राजहत्तीला दरबारातील रिंगणात उभ करण्यात आलं आणि 'जो कोणी पुरुष या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल', अशी घोषणा झाली. शक्ती परिक्षणासाठी सगळे सिद्ध झाले आणि स्वयंवर सुरु झालं. प्रत्येकाला स्वसामर्थ्य सिद्ध करण्याची संधी देण्यात आली. पण राजहत्तीसमोर कोणाच काही चालेना आणि हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय काही केल्या वर होईनात. राजाच्या चेहऱ्यावरचे भाव चिंताक्रांत झाले. राजकन्येला रडू कोसळणार एवढ्यात एक सडपातळ शरीरयष्टीचा ब्राम्हण तरुण सभामंडपी अवतरला. राजासमोर नतमस्तक झाला आणि एका संधीसाठी प्रार्थना करू लागला. राजाने जड मानाने त्याची प्रार्थना मान्य केली. संधी मिळताच तो ब्राम्हण हत्ती समोर जाऊन उभा राहिला. हत्तीचा रिंगणाला एक फेरी मारून हत्तीच्या पाठीमागे थांबला.