India Languages, asked by bhaveshpokale43, 11 months ago

पंख्याची आत्मकथा निबंध

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

चिऊताईची आणि आपली मैत्री अगदी बालपणापासूनची. लहान मुलांसाठीच्या बडबडगीतात, गोष्टींमध्ये साधारण चिऊ गरीब, कष्टाळू, शहाणी व चतुर तर काऊ जरा डामरट, खलप्रवृत्तीचा व काहीसा वेंधळा वा मूर्ख असे रंगवलेले दिसते. निरर्थक म्हटल्या तरी याच काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत बाळ मोठे होत असते. घरात कावळा येणे अशुभ मानले गेले असले तरी चिऊचा मात्र मुक्त वावर घरात असतो. म्हणजे असायचा. आता काँक्रीटच्या जंगलात हिरवळ वाचताना मारामार, तर पक्षी कुठून येणार? तसे पक्षी अनेक आहेत. अगदी संग्रहित केलेले पक्षी सोडले तरी चिमणी, कावळा, साळुंकी, कबुतर, पोपट हे रोजच्या वावरात अगदी सर्रास दिसून येणारे पक्षी. क्वचित घार वा बगळेही दिसतात, कधी दुकानात पिंजऱ्यात घालून विकायला ठेवलेले काकाकुवा वा प्रणयपक्षीही दिसतात. मात्र कबुतर हा आपल्याच तारेत असणारा व घाण करून ठेवणारा पक्षी. पांढऱ्या कबुतराला भले शांतीचे प्रतीक मानत असतील तरी मुलांचे याच्याशी सूत नसते. पूर्वी चाळीत कुणी भिंतीवरल्या खोक्यांमध्ये कबुतरे पाळताना दिसत असत. साळुंकी जरा कर्कशच, शिवाय काहीशी आक्रमक दिसणारी. पोपट बिचारा पिंजऱ्यात. मग या सर्वांच्या मानाने घरात वावरणारी पण तरीही कधी कुणी न पाळलेली चिमणी अगदी घरातली वाटते. चिमणी आपली कुणाच्या अध्यात ना मध्यात. गरजाही फार कमी. टिपायला चार दाणे, वळचणीला एक घरटे की ती खूष! कसलाही बडेजाव नाही, उपद्रव नाही तसेच मोठे देखणे रूप वा मंजुळ आवाज वगरेही नाही. तरीही आवडणारी.

चिमणीच्या डोळ्यात मात्र एक आपुलकी व स्नेहभाव मला नेहमी भासतो. नेहमी घरात येणारी पण तरीही एकदम न घुसता आजूबाजूला उडत, चिवचिवत, थोडा अंदाज घेत, घरातल्यांना आपले आगमन कितपत रुचेल याचा विचार करत हळूच आत शिरणारी व पटकन काहीतरी टिपून भुर्रकन उडून जाणारी. माझ्या या छोट्याश्या पक्ष्याबद्दल अनेक आठवणी आहेत. अगदी लहान असताना भिंतीवरील तसबिरीमागे घरटे केलेली व सतत चिवचिवणारी चिमणी. सकाळी उठून घराबाहेर अंगणात आल्यावर कोवळ्या उन्हात धान्य वा किडे टिपणारी चिमणी. पावसात खिडकीच्या चौकटीवर बसून पाऊस थांबायची वाट पाहत एकीकडे घरात धाकधुकीने पाहणारी चिमणी. घरटे बांधायला चटई वा केरसुणीच्या काड्या घेऊन भिरभिरणारी चिमणी. अनेकदा कुतूहल असूनही चिमणीला हात लावायची संधी कधी आली नव्हती. अचानक एक दिवस ती मिळाली. लहानपणी ऐकून होतो की पक्ष्यांना हात लावला तर इतर पक्षी त्यांना वाळीत टाकतात. त्यामुळे हात लावायलाही भिती वाटायची, न जाणो उगाच आपल्यामुळे एक निष्पाप बळी जायला नको. पण तशी एक संधी आली. एक दिवस (चुकून हो) अभ्यासाला पहाटे उठलो.जरा गार हवा खाऊन ताजे व्हावे म्हणून दार उघडून व्हरांड्यात आलो, तर कठड्यावर एक चिमणी बसल्या बसल्या झोपलेली दिसली. अंगाची पिसे फुलून अंगाला लोकरी गुंड्याचा आकार आला होता, त्यातून छोटीशी शेपटी फुटली होती. मी दबक्या पावलांनी जवळ गेलो. श्वास रोखून पुढे जात मी शिताफीने झडप घालत अलगद ती चिमणी ओंजळीत धरली. त्या स्पर्शाने गाढ झोपेत असलेल्या त्या इवल्या जीवाचा अक्षरशः: थरकाप झाला! विजेरीवर चालणाऱ्या खेळण्यासारखा तो देह आकांताने थरथरला आणि माझी पकड नकळत सुटली. पटकन भानावर येत चिमणी उडून गेली.

एकदा आई बाहेर गेली होती. वडील अर्थातच कामावर. मी आणि लहान बहीण दोघेच घरात होतो. अचानक धातूसारखा नाद व कसलासा दबका आवाज आतल्या खोलीतून आला. मी धावतच आत आलो. बघतो तर एक चिमणी पंख्याच्या पात्याला धडकून घायाळ होऊन पडली होती. मी क्षणभर भांबावून गेलो. काय करावे सुचेना. मग भानावर येत कपाटातील ध्वनिमुद्रण यंत्राला गुंडाळलेले पिवळे मऊ कापड आणले व त्यात चिमणीला अलगद उचलणार तोच बहिणाबाई दाखल झाल्या. "दादा, हे काय करतो आहेस? मी आईला सांगेन." घरचे बाहेर असताना दादाने केलेल्या समस्त कृत्यांचा पाढा आई-बाबा घरी आल्यावर घडाघडा वाचणे हे 'ताई' वर्गाचे ध्येय! मग काय? लगेच मातोश्रींची ध्वनिफीत सुरू: "अभ्यास सोडून तू नसते उद्योग कर वगैरे वगैरे....". संभाव्य धोका लक्षात घेत मी जरा संजूकताईचे धोरण स्वीकारले. मग हळूच बहिणीला समजावले की जर तिची एखादी मैत्रीण पडली असती व तिला लागले असते तर तिला मदत केली असती की नाही? हा मुद्दा बहिणाबाईंना पटला. मग त्या चिमणीला उचलून जखमेवर कापसाने डेटॉल पसरवले. कापूस तसाच चिकटवून धरला. मग त्या चिमणीला तसेच मऊ फडक्यात ठेवून आम्ही काय करावे याचा विचार करू लागलो. "दादा, तिला पणी पाजूया का?" वा! बहिणीची कल्पना मला एकदम पटली. मग तिने भांड्यात पाणी व एक चमचा आणला. आम्ही चमच्याने चोचीवर पाणी टाकायचा प्रयत्न केला पण भेदरलेली चिमणी चोच उघडत नव्हती की हालचाल करत नव्हती. मग थोडे पाणी शिंपडूनही पाहिले. अखेर आम्ही तिला तसेच ठेवून थोडे दूर जायचे ठरवले. हे मात्र लागू पडले. अवघ्या दोन मिनिटात ती चिमणी उडाली.जखमेपेक्षा अपघाताचा आघात अधिक असावा. आम्हाला खूप आनंद झाला.

एकूणच आमच्या सर्व घरांत चिमण्या हजेरी लावून होत्या. एकदा मस्त दुपारचा पांघरूण घेऊन झोपलो होतो. काही वेळाने पायाच्या अंगठ्यावर काहीतरी असल्याचे जाणवले. सावधपणे हालचाल न करता फक्त डोळे किलकिले करून पाहिले तर चक्क एक चिमणी पायाच्या अंगठ्यावरून पसरलेल्या चादरीच्या शेंड्यावर बसली होती. एक नवा बोध झाला. चिमणीला माणसाचे भय नसते, मात्र माणसाने हालचाल केल्यावर ती एकदम सावध होते व बुजऱ्या स्वभावाला अनुसरून उडून जाते.

साडे तीन वर्षांपूर्वी घर बदलले आणे जुने घर सोडून नव्या इमारतीत राहायला आलो. हळूहळू नव्या जागेला सरावलो. आणि एक दिवस सकाळी चहा घेत असताना बैठकीच्या खोलीबाहेरील छज्जावर अचानक चिवचीव आणि लागोपाठ पंखांचा फडफडाट ऐकू आला. चाहूल लागताच चिमण्या उडाल्या होत्या. आईने सांगितले, पूजेचे सामान धुताना वाटीत उरलेल्या चार अक्षता तिने सहज छज्जावर टाकल्या होत्या, त्या टिपायला चिमण्या आल्या असाव्यात. काँक्रीटच्या जंगलात हा पक्षी आपल्या घरात आलेला पाहून मला विलक्षण आनंद झाला. मग तो एक छंदच जडला. रोज सकाळी उठल्यावर चहा घेण्या आधी बाहेर छज्जावर तांदुळाचे दाणे टाकायचे.

Similar questions