India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

पालक या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
2

आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजकाल संयुक्त कुटुंब फार कमी बघायला मिळते. पूर्वी संयुक्त कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, बहिण-भाऊ सर्व एकत्रित राहात असायचे व हे सर्व वयाने मोठे असल्यामुळे ते आपले पालक-वर्ग म्हणून संबोधले जायचे. पण आजकाल कुटुंबाचे विभाजन झाल्यामुळे, विभक्त कुटुंबात फक्त आई-वडील हेच आपले पालक आहेत एवढेच मुलांना समजते. आपल्या जीवनात सर्व सुख दुःखात आपल्या सोबत राहणारे म्हणजेच आपले पालक होय. आपल्याला गुरूप्रमाणे चांगला मार्ग दाखविणारे, कुठे चुकल्यास रागवणारे, आपल्यावर भरभरून प्रेम करणारे आपले पालक नेहमी त्यांच्या पाल्याच्या चांगल्या भविष्यासाठी झटत असतात. मित्रांनो अश्या आपल्या देवरूपी पालकांना कधीही दुखवू नका, त्यांची आजन्म सेवा करा, कारण म्हणतात ना " मातृ-पितृ देवो भव: " एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

Similar questions