Hindi, asked by yashaswichathare, 22 days ago

प्रस्तुत उताच्याहील तुम्हाला नठीत णलेल्या
राष्पांची पदी करा.​

Answers

Answered by himanshuak354
2

Answer:

इयत्ता दहावी : राज्याशास्त्र | राजकीय पक्ष

इयत्ता दहावी : प्रकरण 3 रे

राजकीय पक्ष

स्वाध्याय

प्रश्न 1 ला : योग्य पर्याय निवडून लिहा

1) राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना ‘राजकीय पक्ष’ असे म्हणतात.

अ) सरकार ब) समाज क) राजकीय पक्ष ड) सामाजिक संस्था

उत्तर – क) राजकीय पक्ष

2) ‘नेशनल कॉन्फरन्स’ हा पक्ष ________ या राज्यातील आहे.

अ) ओडिशा ब) आसाम क) बिहार ड) जम्मू आणि काश्मीर

उत्तर – ड) जम्मू आणि काश्मीर

3) जस्टीस पार्टी या ब्राम्हणेत्तर चळवळीचे रुपांतर _______ या राजकीय पक्षात झाले.

अ) आसाम गण परिषद ब) शिवसेना क) द्रविड मुनेत्र कळघम ड) नेशनल कॉन्फरन्स

उत्तर – क) द्रविड मुनेत्र कळघम

प्रश्न 2 रा : विधाने चूक कि बरोबर ते साकारण लिहा

1) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

उत्तर : बरोबर – राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करते.

2) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

उत्तर : चूक – राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना ‘राजकीय पक्ष’ असे म्हणतात.

3) आघाडी शासनातून अस्थिरता प्राप्त होते

उत्तर : चूक – आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला आहे. आघाडी शासन हि बाब आता भारतच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे.

4) ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.

उत्तर : चूक – ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष नाही तर हा पक्ष केवळ पंजाब या एकाच राज्यापुरता मर्यादित आहे म्हणून आपण या पक्षाला ‘प्रादेशिक पक्ष’ असे म्हणू शकतो.

प्रश्न 3 रा : पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) प्रादेशिकता – विशिष्ठ प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणारे पक्ष म्हणजे ‘प्रादेशिक पक्ष’ होय. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्ता आवश्यक वाटते. संघशासनाला सहकार्य करत आपले स्वयात्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात.

2) राष्ट्रीय पक्ष – या पक्षांना चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. भारतात राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, तृणमूल कॉंग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत.

प्रश्न 4 था : थोडक्यात उत्तरे लिहा

1) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

1) सत्ता मिळवणे – राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकींच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत असतात.

2) विचारसरणीचा आधार – प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ठ भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. हि विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते पक्षाला पाठींबा देतात.

3) पक्ष कार्यक्रम – विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली कि या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते.

3) सरकार स्थापन करणे – राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात. हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षाचे असते.

4) शासन व जनता यांच्यातील दुवा – राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करते.

2) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरुपात काय बदल झालेला आहे.

उत्तर : भारतात पक्षपद्धतीच्या स्वरुपात खालील बदल झालेले आहेत

1) स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या पक्ष पद्धतीला ‘एक प्रबळ पक्ष पद्धती’ असे म्हंटले गेले.

2) एक प्रबळ पक्ष पद्धतीला १९७७ मध्ये इतर कॉंग्रेसेतर पक्षांनी एकत्र येवून आव्हन दिले.

2) १९८९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे हि बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात. अनेक पक्षांनी एकत्र येवून आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला आहे. आघाडी शासन हि बाब आता भारतच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे.

Video राजकीय पक्ष 1

Post Views: 5,760

18 August 2020

Post navigation

Previous postNext post

Author

by mahendrasfsep

[email protected]

Related posts

Similar questions