प्रश्न 1 .भौगोलिक कारणे लिहा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो.
नील यांचे स्थान
Answers
Explanation:
अवस्था:
उघडा
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांची बरीच माहिती आपल्याला झालेली असली, तरी भूपृष्ठापासून केवळ काही किमी. खोलीवर कोणत्या प्रकारचे खडक किंवा पदार्थ आहेत, याची प्रत्यक्ष पहाणी करुन त्यांची माहिती मिळवता आलेली नाही. खोल खाणी, तसेच खनिज तेलाच्या शोधासाठी खणलेले नलिकाकूप यांतून भूपृष्ठाखालच्या खडकांचे नमुने उपलब्ध होतात.
जगातील सर्वांत खोल म्हणून गणली गेलेली द.आफ्रिकेतील सोन्याची खाण भूपृष्ठापासून फक्त ३,५४३ मी. खोल आहे. सर्वांत खोल पोहोचणारे नलिकाकूप उ. अमेरिकेत ओक्लाहोमा राज्यात असून ते ९,५८३ मी. खोल गेले आहेत. याचा अर्थ भूपृष्ठापासून ९.५ किमी. पेक्षा जास्त खोल जागी असणाऱ्या खडकांची प्रत्यक्ष माहिती आपणास नाही. पृथ्वीची त्रिज्या ६,३७० किमी. आहे, हे ध्यानात घेतल्यास आपली खडकांची माहिती किती वरवरची आहे, हे ध्यानात येईल.
अर्थात इतर अप्रत्यक्ष मार्गांनी पृथ्वीच्या अंतर्भागाची माहिती करुन घेता आलेली आहे. पृथ्वीच्या कवचाची आणि विशेषकरून पृथ्वीच्या खोल अंतर्भागाची माहिती नैसर्गिक भूकंपांच्या अभ्यासातून मिळाली आहे.
भूकंपामुळे निर्माण होणारे तरंग त्याच्या उगमापासून निघून पृथ्वीच्या आत खोलवर शिरतात, ही गोष्ट अठराव्या शतकातच ध्यानी आली होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पहिले भूकंपमापी यंत्र तयार करण्यात आले.
१९०३ मध्ये इंटरनॅशनल सिस्मॉलॉजी ॲसोसिएशनची (आंतरराष्ट्रीय भूकंपविज्ञान संस्थेची) स्थापना होऊन जगभर भूकंप नोंदणी केंद्रांचे जाळे निर्माण करण्यात आले. तेव्हापासून जगात कोठेही होणाऱ्या भूकंपांची नोंद ठेवण्यात येऊन त्यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. भूकंपतरंगांच्या या अभ्यासातून पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी मिळालेल्या माहितीचे संकलन हॅरल्ड जेफ्रिझ, बेनो गूटेनबेर्ख, के.ई. बुलेन इ. भूवैज्ञानिकांनी केले आहे.
भूकंपतरंगाचे मुख्यतः प्राथमिक, द्वितीयक आणि पृष्ठतरंग असे तीन प्रकार असतात. यांपैकी प्राथमिक आणि द्वितीयक तरंग कवचाखाली शिरून निरनिराळ्या खोलीच्या थरांतून प्रवास करीत भूकंप नोंदणी केंद्राशी पोहोचतात. पृष्ठतरंग मात्र केवळ पृष्ठालगतच्या कवचातूनच प्रवास करतात. यांपैकी प्राथमिक व द्वितीयक तरंगांमुळे पृथ्वीच्या अंतर्भागासंबंधी खूपच महत्त्वाची माहिती मिळू सकते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तो मध्यापर्यंत सर्वत्र सारख्याच भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा पदार्थ असता, तर हे तरंग त्यातून प्रवास करताना विचलित न होता सरळ रेषेत गेले असते; पण प्रत्यक्षात असे दिसते की, खोलीनुसार तेथील पदार्थाची दृढता वाढत जाते. त्यामुळे या तरंगांचा वेगही वाढत जातो आणि प्रकाश किरणांप्रमाणे या तरंगाचे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्यात जाताना दिशेत बदल होण्याची क्रिया) होऊन त्यांचा प्रवासमार्ग गाभ्याकडे बहिर्गोल झालेला दिसून येतो.
भूकंपतरंगांच्या अभ्यासावरून पृथ्वीची पृष्ठभागापासून तो मध्यापर्यंतची रचना ही पृष्ठभाग ते सु. १०-७० किमी. खोलीपर्यंत कवच, त्याच्याखाली २,९०० किमी. खोलीपर्यंत प्रावरण व त्याच्या खाली मध्यापर्यंत गाभा अशा तीन प्रकारच्या संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) थरांची असल्याचे आढळून आले आहे. कवचाची जाडी भूखंडांखाली सर्वांत जास्त व महासागरांच्या तळाखाली कमीत कमी असते. कवचाच्या तळाशी व प्रावरणाच्या वरच्या सीमेशी भूकंपतरंगांच्या वेगात एकाएकी बरीच वाढ झालेली दिसते. १९०९ मध्ये आंद्रिया मोहोरोव्हिसिक यांनी हे सत्य प्रथम उजेडात आणले त्यावरून या सीमापृष्ठाला ‘मोहोरोव्हिसिक असांतत्य सीमा’ असे नाव दिले आहे.
प्रावरणाच्या वरच्या सीमेशी प्राथमिक वरच्या सीमेशी प्राथमिक तरंगांचा वेग ७.८ ते ८.१ किमी./से. असतो. जसजसे अधिक खोल जावे तसतसा हा वेग वाढत जाऊन प्रावरणाच्या तळाशी म्हणजे २,९०० किमी. खोलीवर तो १३.६ किमी./से. होतो. याच खोलीवर द्वितीयक तरंगांचा वेग अनुक्रमे ४.३५ किमी./ से. पासून वाढत जाऊन २,९०० किमी. खोलीवर तो ७.२५ किमी./से. होतो. २,९०० किमी. खोलीपर्यंत जाणारे तरंग गाभ्याच्या दिशेने बहिर्वक्र असलेल्या मार्गाने प्रवास करीत भूकंपाच्या उगमकेंद्रापासून पृष्ठभागावर ११,५०० किमी. अंतरावर असणाऱ्याजागी पोहोचतात.
मात्र येथून पुढच्या ४,५०० किमी. अंतरापर्यंतच्या पट्ट्यातील कोणत्याही जागी प्राथमिक किंवा द्वितीयक तरंगांची नोंद होत नाही. फक्त पृष्ठतरंग मात्र पृष्ठालगतच्या भागातून येत असल्यामुळे त्यांची नोंद या पट्ट्यातील केंद्रात होते. त्यानंतरच्या पुढच्या म्हणजे उगम केंद्रापासून १६,००० किमी. पेक्षा अधिक अंतरावर असणाऱ्यास्थानापासून तो उगमकेंद्रापासून १६,००० किमी. पेक्षा अधिक अंतरावर असणाऱ्या स्थानापासून तो उगमकेंद्राच्या बरोबर विरुद्धपदी असणाऱ्या स्थानापर्यंतच्या सर्व केंद्रात फक्त प्राथमिक तरंग पोहोचल्याची नोंद होते; पण या नोंदणी केंद्रातही द्वितीयक तरंग येत नाहीत.
noooooooooooooooooooooooooooooooooo