History, asked by PragyaTbia, 1 year ago

पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा)

Answers

Answered by ksk6100
9

  पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा)

उत्तर:-  

पोवाडा म्हणजे गद्य व पद्य मिश्रित लिखाणाचे सादरीकरण करण्याचा एक प्रकार होय. घडून गेलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी रचना म्हणजेच पोवाडा होय. पोवाडे हे स्तुतीसुमनं तसेच वीररसपूर्ण देखील असतात. लोकजागृती व मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य उद्देश असतो. पोवाडा पूर्वी राजदरबारात व लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या तालावर सादर केल्या जात असे. पोवाड्यातून राजकीय, धार्मिक, सामाजिक स्थितीचे तसेच रितीरिवाजांचे वर्णन केलेले असते. उमाजी नाईक, चापेकर बंधू , महात्मा गांधी, शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे प्रसिद्ध आहेत. अमरशेख, अण्णाभाऊ साठे इ. शाहिरांनी महाराष्ट्राच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. पोवाड्यामध्ये दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शास्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात. पोवाडा हे इतिहासलेखनाचे एक उपयुक्त असे साधन आहे. अज्ञानदासचा 'अफजल खान वधाचा पोवाडा' तसेच तुळशीदासाने रचलेला 'सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा' हे पोवाडे प्रसिद्ध आहेत.  

Answered by Arslankincsem
3

One of the famous folk songs of Maharashtra is called Powada.

These are songs of the skills of Shivaji Maharaj in the warfare.

They are types of ballads sung to state the bravery of Shivaji and are mainly sung by the Dalits who got inspired by Shivaji to take part in the war.

The singers are known as the Shahir.

Similar questions
Math, 7 months ago