India Languages, asked by sonalijadhav30, 18 days ago

पक्षी घरटी तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात​

Answers

Answered by gedamdarshana450
2

Answer:

प्रजननाच्या काळात नर व मादीची जोडी जमल्यावर पक्षी घरटे बांधण्याच्या तयारीला लागतात. घरटे ज्या भागात बांधावयाचे ते निवडण्याचे काम नर करतो तर प्रत्यक्ष घरटयाची जागा मादी ठरविते. आपल्या चोचीचा व पायांचा उपयोग करून सामान्यपणे मादी घरटे बांधते. काही थोडया जातींत फक्त नरच घरटे बांधतो, तर काही जातींत नर व मादी दोघेही हे काम करतात. पक्ष्यांची घरटी गवत, काटक्या, झाडांची साल, पिसे, कागदांचे तुकडे, चिंध्या, दोऱ्यांचे तुकडे, चिखल, केस, तंतू इ. पदार्थांचा उपयोग करून बनविलेली असतात.

कावळ्याचे घरटे

पक्ष्यांची घरटी विविध प्रकारांची असतात. काही अगदी साधी, तर काही अतिशय कुशलतेने तयार केलेली असतात. टिटवीचे घरटे अगदी साधे असते. मनुष्यवस्तीला सरावलेल्या चिमण्या आणि साळुंक्या घरातील वळचणीच्या जागी किंवा तिरक्या बसविलेल्या फोटोफ्रेमच्या मागे चिंध्या किंवा अन्य तंतुमय पदार्थांचा वापर करून जमेल त्या आकाराची घरटी बांधतात. कबुतरे इमारतींमध्ये मिळेल त्या जागी अंडी घालण्यासाठी काडयाकाटक्यांचा वापर करून आपली ओबडधोबड घरटी तयार करतात. बुलबुल व नर्तक यांची घरटी बागेच्या कुंपणावरील झुडपांत किंवा फांदयांच्या बेचक्यांत पानांच्या आड काटक्या व तंतूंचा वापर करून विणीच्या हंगामात बांधली जातात. ही घरटी वाटयांच्या आकाराची व सुबक असतात. कावळे, घारी, बगळे व करकोचे हे पक्षी विणीच्या हंगामातच झाडांच्या फांदयांच्या बेचक्यांत काडयाकाटक्यांच्या साहाय्याने घरटी बांधतात. वेडयावाकडया काटक्यांपासून कौशल्याने बांधलेली घरटी वाऱ्याने झाड कितीही हलले तरी मोडून पडत नाहीत. येणाऱ्या पावसाळ्याचा अंदाज घेऊन पक्षी झाडांवर वेगवेगळ्या उंचींवर घरटी बांधतात.

कोकिळसारखे पक्षी आपली स्वत:ची घरटी बांधत नाहीत. ते कावळ्यासारख्या अन्य पक्ष्याच्या घरटयात त्यांचे अंडे घालतात आणि मूळ पक्ष्याचे एक अंडे घरटयाबाहेर ढकलून देतात. एकच कोकिळा अनेक कावळ्यांच्या घरटयांत आपले एकेक अंडे घालत असते.

पोपट, घुबड व धनेश हे पक्षी झाडांच्या ढोलीमध्ये घरटी तयार करतात. खंडया व वेडा राघू पक्ष्यांची घरटी जलाशयांच्या काठी उतारावर उघडणाऱ्या बिळांत असतात. बिळांच्या पोकळ जागेत अंडी घालून ती उबविण्याचे आणि पिलांना चारा भरविण्याचे काम नर व मादी करतात. सुतार आणि तांबट हे पक्षी वठलेल्या वृक्षांच्या बुंध्यांचे लाकूड कोरून त्यातील पोकळ घरटयांमध्ये आसरा घेतात. शिंपी पक्षी बदामाच्या पानांसारखी रुंद पाने कौशल्याने जुळवून, त्यांच्या कडा धाग्याने शिवून आपली घरटी तयार करतो. आतील अस्तर कापूस किंवा मऊ पिसे वापरून आरामदायक केलेले असते. त्यांची घरटी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंतच असतात. बरोइंग आउल जातीचे घुबड जमिनीतील बिळात घरटे करून राहते.

स्वॅलो व स्विफ्ट या पक्ष्यांची घरटी लाळमिश्रित चिखलाच्या गोळ्यांनी बनविलेली असून वाडग्याच्या आकाराची असतात. पुलांचे छत व खांब आणि इमारतींच्या भिंती यांना ही घरटी चिकटलेली असतात. नैसर्गिक गुहांमधूनही त्यांच्या वसाहती असतात.

सुगरणीचे घरटे

सुगरण तसेच बाया पक्ष्यांची घरटी जलाशय काठावरील झाडांच्या फांदयांना व माडांच्या झावळ्यांना लटकलेली असतात. शत्रू तेथे पोहोचू नये, हा त्यामागे उद्देश असतो. अरुंद मानेच्या, उलट्या टांगलेल्या व फुगीर बाटल्यांसारख्या आकाराच्या या सुबक घरट्यांचे बांधकाम प्रथम नर सुरू करतो. हे काम घरटयाच्या मानेपर्यंत आल्यानंतर माद्यांचा थवा येतो. घरटयाची आणि ते बांधणाऱ्या नराची निवड झाल्यानंतर नर-मादी मिळून घरटे पूर्ण करतात. घरटयाची जागा सुरक्षित नसेल किंवा ते पसंत नसेल तर त्या नराला जोडीदार मिळत नाही. घरटे बांधण्याचे कौशल्य जर नरापाशी नसेल तर त्याची वंशवेल खुंटते. नैसर्गिक निवडीचे हे एक उदाहरण आहे. आफ्रिकेतील सुगरण पक्ष्यांच्या काही जाती झाडांवर एकच मोठी वसाहत उभी करतात. या वसाहतीत अनेक घरटी असून प्रत्यकाला स्वतंत्र दार असते.

काही बदके व जलकपोत हे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतिजन्य पदार्थांवर तरंगती घरटी बांधतात. गिधाडांची घरटी उंच कडयाकपाऱ्यामध्ये असतात. गरुडाचे घरटे असेच कडयाकपाऱ्यात किंवा झाडावर उंच ठिकाणी असते. गरुड फांदयांच्या बेचक्यात लहानमोठया झाडांच्या वाळलेल्या काटक्यांचा वापर करून २-३ मी. व्यासाचे खोलगट असलेले भक्कम घरटे बांधतात. आतील बाजूला गवत व पानांचे अस्तर असते. गरुडाचे कुटुंब तेच घरटे नीटनेटके करून पिढयानपिढया वापरते. उंच ठिकाणी असलेल्या या घरटयातून त्यांना आजूबाजूचा मोठा परिसर आणि त्यातील भक्ष्य सहज पाहता येते.

Similar questions