pavsavaril kavita in marathi
Answers
Answer:
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
आयुष्याच्या मध्यावर
मागे वळुन पहाता
आठवते पुन्हा पुन्हा
मासुम ती निरागसता
कळलं नाही सरलं कधी
कोवळं ते बालपण का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
पानांच्या आडोश्यात
होती किती सुरक्षितता
नवे अर्थ जीवनाचे
उलगडले उमलता उमलता
नकळत लागली ओढ
आवारा भुंग्याची का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
कधी कोणी घेते
लाडाने डोक्यावर
नशिबी भाग्य कोणाच्या
अर्पण ते चरणावर
निर्जिवतेच्या जाणिवेने
चुकतो काळजाचा ठोका का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
वाढलं अपेक्षांच ओझं
वाढता फुलता फुलता
तन मन गेली फुलवुन
अनोखी ती सुंदरता
क्षणाभराचा खेळ
वैरी ठरतो तो गंध का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
प्रेमाच्या सावलीत होती
केवढी ती वात्सल्यता
कळली थोडी उशीरा
फसवी ती मुक्तता
चिंतीत करतो आता
नाजुक हवेचा झोका का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका
दिवस कसे मजेत गेले
हितगुज करता करता
नशिबी कोणा मुके जीने
सुंदर हारात गुंफता
गेले आज सोडुन कोणी
क्रूर नियतीचा असा खेळ का ?
फुले म्हणाली एकमेका,
चला होऊया आपण कलीका