रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?
Answers
Answer:
खडकांचे रासायनिक विदारण करण्यास पाण्याचा मुख्य वाटा आहे.
तुम्हाला माहीतच असेल कि पाणी हे वैश्विक द्रव्य आहे आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहजपणे विरघळले जातात. खडक हे खनिजांचे बनलेले असतात. यातील काही खनिजे सहजपणे पाण्यात विरघळतात या क्रियेमुळे खडकाचा अपक्षय घडून येतो.
रासायनिक विदारणाचे काही प्रकार पुढीलप्रमाणे
१) द्रवीकरण- खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून जाऊन पाण्याबरोबर वाहून जातात, यामुळे खडक ठिसूळ बनतात. चुनखडी द्राविकारणाच्या प्रक्रियेमुळे तयार होते.
२) भस्मीकरण- ज्या खडकांमध्ये लोहखनिजाचे प्रमाण आढळते तिथे हि प्रक्रिया घडते. लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यानंतर लोह आणि पाण्यातील ऑक्सिजन यांची रासायनिक प्रक्रिया होऊन खडकांचे भस्मीकरण होते.
३) कार्बनन- कार्बन डायऑक्साइड हा निसर्गातील एक महत्वाचा घटक वातावरणात आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिसळून आम्ल तयार होते. या आम्लात चुनखडीसारखी खनिजे सहजतेने विरघळतात. यामुळे खडक ठिसूळ होऊन खडकांचे विदारण होते.
Answer:
द्रवीकरण
भस्मीकरण
है आहेत..