Ras examples in marathi
Answers
They are
Min , kumbh, mithun,rushabh,Taurus,he mini
Mark as brainliest
मराठी भाषेत ९ रसांचा समावेश आहे.
१) शृंगार
हा रस दोन लिंगांमधल्या प्रेम किंवा एकमेकांचा ओढीत दिसून येतो. समोरच्याला आकर्षित करण्यासाठी ह्या रसाचा वापर करण्यात येते.
उदा- दोघे एकमेकांकडे खट्याळ नजरेने पाहत होते.
२) वीर
हा रस शौर्य व साहस दर्शवतो. पराक्रमाची एक गुणवत्ता वागणातून व प्रसंगातून दिसून येते.
उदा- शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती.
३) करुण
हा रस दुःख दर्शवतो. ह्या रसात दया ही भावना प्रसंगमधून दिसून येते.
उदा- त्या भुकेल्या मुलाकडे पाहून माझी भूक मेली.
४) रौद्र
हा रस राग दर्शवतो. चीड व रागाची भावना प्रसंगातून दिसून येतो.
उदा- त्या खुन्याला पाहून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली.
५) हास्य
हा रस व्यंगचा, असे म्हंटले तर चुकणार नाही. ह्या रसात गमतीचा भाग दिसून येतो.
उदा- नापास झाल्यावर मास्टर बोलले, " आता वडापावची गाडी टाक आणि भजी तळत बस".
६) भयानक
हा रस भीतीचा प्रसंग दर्शवतो. मृत, सूड, भूत हे सगळं ह्या रसात समाविष्ट आहे.
उदा- अंधारात खोल गेलो तर एक मृतदेह दिसला, रक्ताने भिजलेला, माझ्याकडे पाहून हसत होता.
७) बीभत्स
हा रस वीट दर्शवतो. एखाद्या प्रसंगाचा किळस वाटलं तर तो ह्या रसात येतो.
उदा- तो मृतदेख किड्यानी भरला होता.
८) अदभुत
आश्चर्यकारक प्रसंग दिसला की तो अदभुत रसाचा भाग आहे.
उदा- असावं सुंदर चॉकलेटचा बांगला.
९)शांत
प्रसंगात भक्ती भाव आढळला व परमेश्वराचा उल्लेख आला की तो रस शांत रस होय.
उदा- नाम तुझे घेता देवा, होई समाधान.