CBSE BOARD X, asked by mgranandhi7465, 11 months ago

रसिक कला मंडळ समर्थनगर , पुणे आकाश कंदील आणि पण त्या तयार करण्याची कार्यशाळा प्रवेश निः शुल्क प्ररम येणाऱ्या येणाऱ्यास प्राधान्य वस्तू खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध दिः ४ व५ नोव्हेंबर सायं . ४ ते ५ स्थळ रानडे सभागृह समर्थनगर , पुणे नागरिक या नात्याने कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा किंवा चांगल्या उपक्रमाबद्दल उपक्रमा बद्दल संस्थेचे अभिनंदन करणारे पत्र लिहा

Answers

Answered by bestanswers
172

औपचारिक पत्रलेखन - कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा किंवा चांगल्या उपक्रमाबद्दल उपक्रमा बद्दल संस्थेचे अभिनंदन करणारे पत्र लिहा

वासंती जोशी

नारायण पेठ, पुणे

१६ जानेवारी २०२०

प्रति,

कार्याध्यक्ष,

रसिक कला मंडळ समर्थनगर , पुणे  

विषय: कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणेबाबत  

महोदय,

४ आणि ५ नोव्हेंबर रोजी रानडे सभागृहात संपन्न झालेल्या तुमच्या कार्यशाळेला मी जातीने भेट दिली होती. तुम्ही करत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. तेथे तयार झालेले आकाश कंदील आणि पणत्या अतिशय सुबक आणि सुंदर होत्या.

मी स्वतः वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी काम करते. तेथील लोकांसाठी दिवाळी भेट म्हणून मला काही आकाश कंदील आणि पणत्या खरेदी करण्याची इच्छा आहे.  

 

मी स्वतः तुमच्या कार्यालयात येऊन भेट देईन आणि वरील सामान खरेदी करेन.  

तुम्ही ते सामान वाजवी दराने उपलब्ध करून द्याल अशी मला खात्री आहे.

आपली  विश्वासू,

वासंती.  

Answered by ruchisontakke107
37

answer

I hope it will help you

Attachments:
Similar questions