CBSE BOARD X, asked by siddharthsundansaaho, 1 month ago

साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या मित्राची कविता प्रसिद्ध झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by suhaniohol2513
5

Answer:

दिनांक 5 डिसेंबर 2020

प्रिय प्रसाद,

अनेक शुभाशीर्वाद.

अरु, साहित्यसंपदाच्या दिवाळी अंकात तुझी ‘समर्पण’ कविता पाहिली आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ‘साहित्यसंपदा’ सारख्या प्रसिद्ध दिवाळी अंकात तुझी पहिलीवहिली कविता प्रकाशित व्हावी, तीही एवढ्या लहान वयात! माझ्यासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

समर्पण’ या नावातच सुंदर भावना दडली आहे! कवितेची भावना तू अलगद उलगडून दाखवली आहेस. शब्दांच्या अचूक निवडीमुळे कविता अधिक खुलली आहे. अवांतर वाचनामुळे तुझे शब्द सामर्थ्य वाढले आहे, हे जाणवते.

यापुढेही तुझ्याकडून अशाच वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या पण आशयपूर्ण लेखनाची अपेक्षा आहे. तू नक्कीच खूप मोठा लेखक होशील! परमेश्वर तुझ्या प्रतिभेला अधिक चमक देवो, हीच सदिच्छा!

येथे उन्हाळी सुट्टीत घरी येईल तेव्हा तुझ्यासाठी गंमत जाणार आहे. आई-बाबा व चिनू कसे आहेत?

आई-बाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग.

कळावे,

तुझाच मित्र,

कु. ( नाव),

शारदाश्रम वसतिगृह,

परिमल पेठ,

पाषाण मारुती मंदिराशेजारी,

पुणे.

Explanation:

HOPE IT'S HELPFUL TO YOU

PLEASE LIKE RATE AS EXCELLENT

FOLLOW

MARK AS BRAINLIST PLEASE

GOD WILL BLESS YOU

Similar questions