Geography, asked by JasonR4195, 1 year ago

स्पष्टीकरण लिहा: अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

Answers

Answered by pkengineer
4

1. भांडवलशाही

2. सामाजिक

3. मिश्रित

Answered by gadakhsanket
22
★ उत्तर - अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

१)भांडवलशाही अर्थव्यवस्था
२)सामाजिक अर्थव्यवस्था
३)मिश्र अर्थव्यवस्था

१) भांडवलशाही अर्थव्यवस्था- भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे असते.कमाल नफा मिळवणे हा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. जर्मनी ,जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी हि अर्थ व्यवस्था स्वीकारली आहे.

२)समाजवादी अर्थव्यवस्था- समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात.सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. चीन रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे.

३) मिश्र अर्थव्यवस्था - या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सअस्तित्व असते.या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो .भारत स्वीडन ,युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी हि अर्थव्यवस्था स्वीकारली आहे.

धन्यवाद...
Similar questions