संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वत : च्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८ - १० वाक्यांत लिहा
Answers
संशोधक म्हणजे संशोधन करणारा. जो नवीन गोष्टींचा शोध लावतो, तो संशोधक. संशोधक होण्यासाठी मी माझा व्यक्तिमत्वात पुढील बदल करीन:
१) मी प्रत्येक गोष्ट निरखून पाहीन व त्याच्यावर विचार करीन.
२) मी प्रश्नांचा गहन अभ्यास करून, त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करीन.
३) मी नियमित अभ्यास करायची सवय लावीन.
४) मी माझा ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करीन.
५) मी माझं काम वेळेवर करीन.
६) एखाद्या समस्येवर मी नवीन निवारण शोधिन.
७) मी आजूबाजूला नेहमी लक्ष ठेवीन
८) मी नेहमी सतर्क राहीन.
Answer:
मला विज्ञानाची आधीपासूनच खूप गोडी आहे. त्यातून मला संशोधक होण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी मला स्वत:मध्ये खूप बदल करावे लागतील. प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. कुणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास न ठेवता विज्ञानाच्या कसोटीवर ती गोष्ट मी तपासून पाहीन. समाजाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडेल, त्यांना फायदा होईल असा शोध लावण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षित यश मिळेपर्यंत सतत त्याचा पाठपुरावा करेन. एखादया प्रयोगात अपयश जरी आले तरी हार न मानता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत राहीन.