संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव काय आहे?
Answers
Answer:
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
हे ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव आहे.
Explanation:
तूम्हांस हे मदत दायक ठरो.☺️☺️
उत्तर :-
संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी.
महाराष्ट्रा मधील अनेक महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध संतांपैकी श्री ज्ञानेश्वर यांचे नाव आवर्जून घेण्यात येते.
अतिरिक्त माहिती :-
श्री ज्ञानेश्वर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठावर असलेले आपेगाव या ठिकाणी झाला.
त्यांच्या आईचे नाव- रुक्मिणी, वडिलांचे नाव- विठ्ठल होते.
भाऊ - निवृत्तीनाथ आणि सोपान देव.
बहिण - मुक्ताबाई.
★ ज्ञानेश्वरां द्वारे लिखित रचना :-
- ज्ञानेश्वरी
- हरिपाठ
- अभंग
- अमृतानुभव
• संत ज्ञानेश्वर तेराव्या शतकातील महान संतांपैकी एक होते.
• त्या काळात सर्व धर्म ग्रंथ हे संस्कृतमध्ये उपलब्ध असत. सामान्य नागरिकांना त्याचे ज्ञान नसे. भगवद्गीता संस्कृत मध्ये उपलब्ध असे त्यामुळे अनेकांना ते समजण्यास अवघड वाटे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली.
• ज्ञानेश्वरी मधील ओव्यांमध्ये ज्ञान योग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचा सुंदर मिलाफ घडून येताना दिसतो.
• हरिपाठ द्वारी हरी नामाची महती तसेच अमृतानुभव द्वारे तत्त्वज्ञान सामान्य जनतेसमोर प्रस्तुत केले.
• माउली या प्रेमळ नावाने त्यांना भक्त संबोधित करतात.
• वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणी नदीकाठी (आळंदी) कार्तिक वद्य त्रयोदशीला (इ.स. १२९६) संजीवन समाधी घेतली.
• आळंदी पुण्यापासून २२.१ किलोमीटर अंतरावर आहे. इथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. आजही भक्त जनांचा मेळा माऊली - माऊली च्या गजरात नामस्मरण करताना आढळून येतो.