स्त्री जन्माला नकार नको निबंध
Answers
स्त्री भ्रुण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. परळीतलं डॉ. सुदाम मुंडे यांचे हॉस्पीटल तर ह्या गोरख धंद्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. ह्या हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉ. मुंडेवर कारवाईसाठी हात उचलला गेला. तो डॉक्टर सध्या फरार आहे. पण हा गोरखधंदा त्या हॉस्पीटलमध्ये होत होता हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का गेली नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रुण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. यावरुन महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..
मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.
Disclaimer- Kindly ask your query in Hindi.
■■स्त्री जन्माला नकार नको■■
स्त्री ती असते जी तिच्या आगोदर, तिच्या कुटुंबीयांचा विचार करते, जी तिच्या कुटुंबीयांच्या हितासाठी स्वतःच्या आवडी निवडींचा बलिदान करते. स्त्री तिच्या घरासोबत तिचे बाहेरचे काम सुद्धा यशस्वीपणे करते.
स्त्रीने आज इतके यश मिळवून सुद्धा तिला समाजात तो आदर मिळत नाही जो तिला मिळायला हवा.आज ही बरेच लोक मुलांना मुलींपेक्षा जास्त मानतात. त्यांना वंशाचा दिवा तर हवा असतो, पण घरासमोर लावलेली पणती नको असते.
स्त्रीभ्रूण हत्या आजही आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात होत आहे. गर्भात मुलगी आहे हे कळताच, काही लोकं गर्भपात करून त्या निरागस जीवाला मारून टाकतात.
अहो! तुम्ही हा विचार का नाही करत की स्त्री कुठल्याही क्षेत्रात माणसापेक्षा कमी नाही. आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगातील प्रत्येक क्षेत्रात देशाला यश मिळवून देत आहे.
जर मुलीला संधी दिली गेली तर ती कोणतेही काम करू शकते.तिच्यावर विश्वास ठेवा,तिला प्रोत्साहन द्या, तिचा समर्थन करा. ती नक्कीच तिच्या कामात यश मिळवेल.
म्हणून, स्त्री जन्माचा समर्थन करा.