World Languages, asked by as0420724, 9 days ago

स्वामी वेवाकानांद information इं कोंकणी​

Answers

Answered by anshunaman03
2

Answer:

नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुनेश्वरीदेवी असे होते. स्वामी विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे "संस्कृत" व "परीक्षण' भाषेचे एक विद्वान होते.

नरेंद्रनाथ यांच्‍यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा प्रभाव होता, कारण त्यांचे आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.

स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण, महाभारत, भगवत गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते. स्वामी विवेकानंदांनी १८८४ ला आपले शिक्षण पूर्ण करून "आर्ट्स" चे डिग्री मिळाली होती त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.

रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना घडवले होते आणि त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले होते. स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे. भारतीय समाज सर्व समर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे.

स्वामी विवेकानंद ह्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते. अमेरिके मध्ये शिकागो येथे १८९३ मध्ये सर्वधर्मपरिषद झाली होती. तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तिथे स्वामी विवेकानंदांचे भाषण एकूण सर्व लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्या ह्या भाषणामुळे हिंदुधर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद ही विश्व प्रसिद्ध झाले.

अमेरिके वरून परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आपले विचार लोकांना सांगायला सुरु केले. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले.

Similar questions