संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?
Answers
★उत्तर - संविधानाप्रमाणे पुढील कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे.
*भारतात पूर्वी धर्म, जात, वंश इत्यादी कारणां-
वरून भेदभाव केले जात होते.
*कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातींना कोणतेही अधिकार नव्हते.त्या लोकांचे जीवन खूप हलाखीचे होते.
*स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे संविधान तयार झाले.संविधानाने सर्व समानतेचे तत्व स्वीकारले आहे .भारतात धर्म, वंश, जात, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान या कारणांवरून नागरिकांत भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली.
धन्यवाद
भारतात अनेक जाती आणि धर्म अस्तित्वात आहेत, आधुनिकीकरणामुळे धर्माचा बोलबाला कमी झाला आहे.
आपल्या पारंपरिक विचारसरणी सोडून भारत आता बदलत आहे, याचे कारण भारताचे संविधान आहे.
संविधान भारताचा सर्वोच्च कायदा असून कोणीही याच्या पुढे नाही, यासमोर सगळे सारखे आहेत.
त्याच्यासमोर सगळे समान असून सगळे फक्त भारतीय आहेत.
संविधानाने सगळ्यांना सारखे अधिकार दिलेले आहेत.
संविधानाप्रमाणे कोणीही खालील बाबींवरून भेदभाव करू शकत नाही.
१) नागरिकांचा धर्म - कोणताही धर्म उच्च किंवा नीच नाही
२) नागरिकांची जात आणि वंश - कोणीही जातीवरून कोणाचा अपमान करू शकत नाही.
३) नागरिकाचे लिंग, महिला आणि पुरुषाला समान हक्क संविधानाने दिले आहेत.
४) आणि त्याचे जन्मस्थान