स्वच्छ भारत अभियान या विषयावर निबंध लिहा
Answers
आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांना मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. आपला भारत देश स्वच्छ करण्यासाठी व सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक. भारत आणि पाश्चात्त्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता.. त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत असतात कारण तेथील प्रत्येकजण आपल्या देशाबद्दल प्रेम करतात. स्वच्छतेमुळे रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाही आणि आपली जीवनशैली बदलून जाते. स्वच्छ परिसरात लोक मॉर्निंग वॉकला जाताना दिसतात, मुले स्वच्छ पटांगणात खेळतात, अभ्यासाचा ताण कमी होतो, ती खुश राहू लागतात, आपल्याला हे सगळं माहित आहे पण तरीही आपण यासाठी काहीही करीत नाही. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले व परिसर दुसऱ्याचे ह्या विचारानेच आपल्या भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही हो त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. पण जोपर्यंत आपण स्वच्छताप्रिय होत नाही, तोपर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. आपल्याला "ग्रीन आणि क्लीन इंडिया" बनवण्यासाठी सर्वांना सोबत येऊन स्वच्छतेची शपथ घ्यावी लागणार आहे व आपला भारत देश स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो "जय हिंद जय भारत !"