Social Sciences, asked by kaikashaparveen320, 8 months ago

सहचर मानव प्राणी मनजे काय​

Answers

Answered by BrainlyBoss07
2

Answer:

तुलनात्मक मानसशास्त्र : मानसशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा. निरनिराळ्या प्राण्यांच्या वर्तनातील साम्य आणि भेद जाणून घेण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र. त्यायोगे विविधजातीय प्राण्यांच्या जीवनव्यवहारांविषयी मौलिक माहिती मिळते आणि पर्यायाने मानवाच्या जीवनावरही बोधप्रद प्रकाश पडतो. म्हणूनच या शाखेला ‘प्राणिमानसशास्त्र’ असेही म्हटले जाते.

तुलनात्मक मानसशास्त्र : मानसशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा. निरनिराळ्या प्राण्यांच्या वर्तनातील साम्य आणि भेद जाणून घेण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र. त्यायोगे विविधजातीय प्राण्यांच्या जीवनव्यवहारांविषयी मौलिक माहिती मिळते आणि पर्यायाने मानवाच्या जीवनावरही बोधप्रद प्रकाश पडतो. म्हणूनच या शाखेला ‘प्राणिमानसशास्त्र’ असेही म्हटले जाते.मानसशास्त्रीय संशोधनास, विशेषतः प्रायोगिक निरीक्षणास, मानवेतर प्राणी फार सोईचे असतात. कारण त्यांचे वर्तनव्यापार कमी गुंतागुंतीचे असल्याने त्यांची उकल करणे काहीसे सोपे जाते. शिवाय मानवेतर प्राण्यांची शारीरिक वाढ झपाट्याने होते व त्यांचे आयुर्मानही थोडे असते त्यामुळे एकाच प्राण्यांचे संपूर्ण जीवन डोळ्याखालून घालणे शक्य होते तसेच अनेक पिढ्यांचे निरीक्षण करता येते. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जे संशोधन करता येत नाही ते अन्य प्राण्याच्या बाबतीत करता येते. जी आहारनिद्राभयविषयक नियंत्रणे मनुष्यप्राण्यावर लादता येत नाहीत, ती अन्य प्राण्यांवर लादता येतात. ज्या शस्त्रक्रिया सामाजिक वा नैतिक कारणांपायी मनुष्यावर करणे व्यवहार्य नसते,त्या अन्य प्राण्यांवर ज्ञानार्जनाप्रीत्यर्थ करणे क्षम्य मानले जाते.

तुलनात्मक मानसशास्त्र : मानसशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा. निरनिराळ्या प्राण्यांच्या वर्तनातील साम्य आणि भेद जाणून घेण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र. त्यायोगे विविधजातीय प्राण्यांच्या जीवनव्यवहारांविषयी मौलिक माहिती मिळते आणि पर्यायाने मानवाच्या जीवनावरही बोधप्रद प्रकाश पडतो. म्हणूनच या शाखेला ‘प्राणिमानसशास्त्र’ असेही म्हटले जाते.मानसशास्त्रीय संशोधनास, विशेषतः प्रायोगिक निरीक्षणास, मानवेतर प्राणी फार सोईचे असतात. कारण त्यांचे वर्तनव्यापार कमी गुंतागुंतीचे असल्याने त्यांची उकल करणे काहीसे सोपे जाते. शिवाय मानवेतर प्राण्यांची शारीरिक वाढ झपाट्याने होते व त्यांचे आयुर्मानही थोडे असते त्यामुळे एकाच प्राण्यांचे संपूर्ण जीवन डोळ्याखालून घालणे शक्य होते तसेच अनेक पिढ्यांचे निरीक्षण करता येते. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जे संशोधन करता येत नाही ते अन्य प्राण्याच्या बाबतीत करता येते. जी आहारनिद्राभयविषयक नियंत्रणे मनुष्यप्राण्यावर लादता येत नाहीत, ती अन्य प्राण्यांवर लादता येतात. ज्या शस्त्रक्रिया सामाजिक वा नैतिक कारणांपायी मनुष्यावर करणे व्यवहार्य नसते,त्या अन्य प्राण्यांवर ज्ञानार्जनाप्रीत्यर्थ करणे क्षम्य मानले जाते.एका अर्थी, अन्य प्राण्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास हा नेहमी तुलनात्मकच असतो असे म्हणावयास हरकत नाही. जेव्हा जेव्हा आपण इतर प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण वा विवेचन करीत असतो, तेव्हा तेव्हा आपल्या विचारांच्या पार्श्वभूमीत, आपणास सुपरिचित असलेले मानवी वर्तन अनुस्यूत असतेच. कळत न कळत आपण इतर प्राण्यांची मनुष्यप्राण्याशी तुलना करीत असतोच.

Similar questions