India Languages, asked by Kurian4746, 7 months ago

samaj seva ka anubhav in marathi nibandh images for 8

Answers

Answered by Dhruv8484
11

Answer:

माझी समाजसेवा मराठी निबंध

Samaj Seva Essay In Marathi

माझी समाजसेवा मराठी निबंध लिहीताना आठवण येते माझ्या शाळेतील विषयाची इयत्ता आठवीत आल्यापासून 'समाजसेवा' हा माझा शालेय अभ्यासातील एक विषय झाला. या विषयाच्या पहिल्या तासिकेतच गुरुजींनी समाजसेवेची आवश्यकता, तिचे स्वरूप यांबद्दल माहिती सांगून अनेक समाजसेवकांची चरित्रे ऐकविली. तेव्हापासून माझ्या मनात एक स्फुल्लिग पडले की, आपणही समाजसेवा करावी. पण समाजसेवा कशी करावी या प्रश्नाने मी बेचैन झालो. मनात हेतू ठेवला की माणूस त्याच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्यानुसार रस्त्यात कुणी आंधळा माणस रस्ता ओलांडताना दिसला की मी धावत जाऊन त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करतो. तसेच कुणी पल्ला हुडकत असला की मी त्याच्या सेवेस हजर होतो. यात्रेच्या गर्दीत कूणाची मुले हरवली तर त्यांच्यासाठी मी धावून जातो. इतकेच काय पण यंदा उन्हाळ्यात मी आमच्या अंगणात एक माठ ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना माठातील थंडगार पाणी देताना मला कृतार्थता वाटते. पण एवढ्याने मला समाधान नव्हते.

याहूनही काही भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा होती. ती संधी मला आयतीच लाभली. यंदाचे वर्ष शासनाने 'प्रौढ शिक्षण योजनेचे वर्ष म्हणून जाहीर केले. देशात निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जोवर मतदार निरक्षर आहे. तोवर या लोकशाहीला काही अर्थ नाही. म्हणून शासनाने प्रौढ शिक्षण योजने'चा धडाडी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातील काही कामगिरी आमच्या शाळेकडे आली आणि तेथून ती आमच्याकडे आली. विशेष लक्षणीय अशी समाजसेवा करावयास मिळणार म्हणून आम्ही विलक्षण आनंदित झालो होतो.

Samaj Seva Essay In Marathi

या कार्यासाठी आमच्याकडे सोपविण्यात आलेली झोपडपट्टी गुरुजींनी आम्हांला दाखविली. मग आम्ही चौघेजण तेथे 'पूर्वमाहिती गोळा करण्यासाठी गेलो. दुपारच्या वेळी गेलो तर तेथे कोणी भेटणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तेथे सायंकाळी गेलो. त्यावेळी कष्टाची कामे करून ते लोक परतले होते. २० ते ५० च्या वयोमर्यादेतील किती माणसे निरक्षर आहेत, याची माहिती आम्हांला हवी होती; पण अतिशय साशंक होऊन कोणतीही माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला. तेव्हा आम्ही नोकरीचे आमिष त्यांच्यापुढे ठेवले. मग ते थोडे थोडे बोलू लागले. अशा दोन-चार वेळा भेटी झाल्यावर त्यांना आमच्याविषयी थोडा विश्वास वाटू लागला. मग एका सणाच्या निमित्ताने आम्ही तेथील मारुतीच्या देवळात एक सास्कृतिक कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमातील लोकनाट्यात एका निरक्षराची सावकाराकडून झालेली पिळवणूक व त्यात त्याची झालेली वाताहत दाखविलेली होती. लोकनाट्यातील या निरक्षराच्या जीवनाचे ते विदारक चित्र त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते. त्यामुळे त्यांना ते खूपच आवडले.

पढे आम्ही नित्यनियमाने त्या वसाहतीत जाऊ लागलो. कधी गोष्टी सांग, कधी गाणी म्हणन दाखव, कधी कीर्तन करून दाखव अशा नित्य नवीन मार्गाने आम्ही त्यांना रंजवीत होतो. अलीकडे ते सारेजण कामावरून परतले की जेवणे उरकून सरळ देवळात येत. त्यांच्याबरोबर महिला देखील येत. मनोरंजनाबरोबर त्यांना शिक्षण देणे हा आमचा हेतू होता. कधी कधी आम्ही त्यांना विविध माहितीपर बोलपटही दाखवीत असू. ते जी श्रमाची, मोलमजुरीची कामे करीत, ती प्रगत देशात यंत्रावर कशी चालतात हे पाहिल्यावर त्यांना गमत वाटली; पण त्याच वेळी त्याच्यातील एकाने मला सवाल टाकला, “पण काय हो, ही कामे यंत्राने झाली तर आम्ही बेकार नाही का होणार?" अशा तहेने त्यांच्यात विचारमंथन होऊन, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला होता. आता मोठी मोठी अक्षरे लावून ते वाचू लागले होते.

बरोबर दोन महिन्यांनी आम्ही त्यांच्या हातांत पाट्या दिल्या. आता ती राठ बोटे अक्षरे वळवु लागली. त्यासाठी आम्हांला व त्यांना देखील खूप कष्ट पडले; पण शिक्षण असाध्य राहिले नाही. आज आमची ही झोपडपट्टी शंभर टक्के साक्षर झाली आहे. त्यांनी बँकेत आपली खाती उघडून ते नियमितपणे पैसेही शिल्लक टाकतात. “या पोरांनी आम्हांला नवं जग दाखवलं," असे ते कौतुकाने म्हणतात व आपण साक्षर झाल्यावर दुसऱ्या एकाला तरी साक्षर करणार असा संकल्प सोडतात. याहून अधिक काय साधावयाचे असते समाजसेवेतून!

Answered by Anonymous
13

माझी समाजसेवा मराठी निबंध लिहीतानाआठवण येते माझ्या शाळेतील विषयाची इयत्ताआठवीत आल्यापासून 'समाजसेवा' हा माझाशालेय अभ्यासातील एक विषय झाला. या विषयाच्या पहिल्या तासिकेतच गुरुजींनी समाजसेवेची आवश्यकता, तिचे स्वरूप यांबद्दल माहिती सांगून अनेक समाजसेवकांची चरित्रे ऐकविली. तेव्हापासून माझ्या मनात एक स्फुल्लिग पडले की, आपणही समाजसेवा करावी. पण समाजसेवा कशी करावी या प्रश्नाने मी बेचैन झालो. मनात हेतू ठेवला की माणूस त्याच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्यानुसार रस्त्यात कुणी आंधळा माणस रस्ता ओलांडताना दिसला की मी धावत जाऊन त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करतो. तसेच कुणी पल्ला हुडकत असला की मी त्याच्या सेवेस हजर होतो. यात्रेच्या गर्दीत कूणाची मुले हरवली तर त्यांच्यासाठी मी धावून जातो. इतकेच काय पण यंदा उन्हाळ्यात मी आमच्या अंगणात एक माठ ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना माठातील थंडगार पाणी देताना मला कृतार्थता वाटते. पण एवढ्याने मला समाधान नव्हते.

Similar questions