India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

शिक्षण या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
2

आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो सर्वाना सुप्रभात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना शिक्षणाची गरज आहे. शिक्षण घेतल्यामुळे आपण जगाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून नावारूपास येतो. शिक्षणासारखे दुसरे कोणतेच अवजार सशक्त नाही. शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत, साक्षार, प्रामाणिक, कर्तबगार बनतो. साक्षर व्यक्तीच जगाचा विकास घडवू शकतो. म्हणून शिक्षण हे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे आहे. आपल्या मानसिक गुणांचे संवर्धन, बौद्धिक विकास,  तसेच आपल्यातील दोषांचे उच्चाटन शिक्षणामुळेच होऊ शकते. स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी ज्ञान म्हणजेच शिक्षण आवश्यक आहे. अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम शिक्षणाच करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  हे नेहमीच असं म्हणत असे कि, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही", एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवीतो.

Similar questions