Hindi, asked by dhanashrideshpande98, 10 months ago

short moral story in Marathi​

Answers

Answered by chiragmodgil2008
10

Answer:

Explanation:here is the answer

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात आपले प्रतिबिंब पाहायचा. स्वतःशीच आपल्या सौन्दर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा,”माझा डोलदार पिसारा पाहा! त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पाहा ! माझ्याकडे पाहा ! जगातील सर्व पक्ष्यांमध्ये मीच सर्वात सुंदर आहे.”

एक दिवशी मोराला नदीकिनारी एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. मग तुच्छतेने तो करकोच्याला म्हणाला,” किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरेफटक आणि निस्तेज आहेत.”

करकोचा म्हणाला,” मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखे सुंदर नाहीत. पण म्हणून काय झाल? तुझ्या पंखानी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखानी आकाशात उंच उडू शकतो.” एवढे बोलून करकोचा झपकन आकाशात उंच उडाला. मोर खजील होऊन त्याच्या कडे बघत राहिला.

तात्पर्य: दिखाऊ सौन्दर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची.

Similar questions