India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on Organ Donation in Marathi
मराठी भाषण अवयव दान

Answers

Answered by darshanajumbad
7

भारतात अवयव निकामी झाल्यानंतर , प्रत्यारोपणाभावी सुमारे पाच लाखाहून अधिक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षभरात दोन लाख रुग्ण यकृताच्याअभावी तर 50 हजार रुग़्ण हृद्यरोगामुळे मृत्यूमुखी पडले. तर किडनीविकारात 1.5 लाख रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत होते परंतू त्यापैकी केवळ 5 हजार रुग्णांनाच किडनी प्राप्त झाली. यावरूनच अवयवदानाची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र यासाठी कॅडेव्हर रोपणासंबंधी देखील समाजात जागृती होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार ,आरोग्य विभागाची 'अवयव दान' मोहिमेची ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर जुही पवारची सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी - जुही पवार – वडिलांना जीवनदान देणार्‍या कन्येची, प्रेरणादायी कहाणी

कॅडेव्हर रोपण पदधती म्हणजे काय ?

एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर , त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जातात. त्यास कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणतात. ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे दान होऊ शकते.

मात्र अवदानाबाबत पुरेशी माहिती व जागृती नसल्याने त्याबद्दल काही गैरसमज आहेत. तर मग दुर करा हे गैरसमज आणि अवयवदानासंबंधी एक पाऊल पुढे या.

पहिला गैरसमज -

अवयव दान करण्याचे माझे वय उलटून गेलयं -

सत्य -: अवयवदानासाठी कोणतेही विशिष्ट निश्चित वय नसते. कोणतीही व्यक्ती अवयवदान करू शकते. मात्र त्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते. त्यानुसार डॉक्टर अवयवदानासंबंधी तुम्हाला सल्ला देतील.

दुसरा गैरसमज –

अवयवदानामुळे अंतिम संस्कारांना वेळ लागतो.

सत्य -: मृत्यूच्या पश्चात 12 ते 24 तासांच्या आत अवयवदान केले जाते. त्यामुळे अंतिमसंस्कारांवर त्याचा परिणम होत नाही.

तिसरा गैरसमज -

मृत्यूपश्चात माझ्या अवयव दानाचा खर्च माझ्या कुटुंबियांना करावा लागेल.

सत्य -: मृत्यूपश्चात दात्याच्या कुटुंबीयांना , अवयवदानासंबंधी कोणताही खर्च उचलावा लागत नाही. मात्र अंतिम संस्काराचा खर्च कुटुंबीयांनाच करावा लागतो.

चौथा गैरसमज -

ब्रेनडेड व्यक्तींना लाइफ़ सपोर्ट सिस्टिम / व्हेन्टिलेटर वरून काढून टाकणे म्हणजे त्यांना मारून टाकणे

सत्य-: ज्यावेळेस रुग्ण ब्रेनडेड घोषित केला जातो, तेव्हा तो मृतावस्थेतच असतो. त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. परंतू ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने ते अधिकाधिक अवयव दान करू शकतात.

पाचवा गैरसमज -

जर मृत्यूपश्चात नेत्रदान केले तर पुढील जन्मी आंधळेपणा येतो.

सत्य- : डोळे दान करण्याचा आणि पुढल्या जन्माचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. उलट मृत्यूपश्चात नेत्रदान केल्यास तुम्ही इतरांचे आयुष्य प्रकाशमान करू शकाल. त्यामुळे निर्णय तुमच्या हातात आहे.

Answered by Haezel
24

मराठी भाषण अवयव दान :

अवयव दान हे दोन प्रकरात मोडते, एक म्हणजे मृत्युनंतर आणि जीवंत असतांना केले जाते. जीवंत व्यक्ती अवयव दान करते तेव्हा तीच्या जीवाला धोका नसतो फक्त त्या व्यक्तीच एक अवयव कमी होतो . त्यामुळे मृत्यु नंतरचे अवयव दान हे योग्य आहे. अवयव दान जागृतीसाठी २७  मार्च हा अवयव दान दिन म्हणुन साजरा केला जातो. एक व्यक्ती मृत्यु नंतर सात जणांना  जीवनदान देऊ शकतो. समाजात अवयव दान करण्यासंबंधी जनजागृती कर्णे खुप गरजेचे आहे. काही विशिष्ट काळा पर्यंतच अवयव दान करता येते. प्रत्येक अवयवाच काळ वेगवेगळा आहे. १८ वर्षावरील व्यक्ती अवयव दान करु शकतो. एखाद्या व्यक्तीस जर काही दीर्घ आजार, अपघात, आत्महत्या झाला असेल तर त्या व्यक्तीचे अवयव दान स्वीकारले जात नाही. तसेच नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्या रुग्णांच्या नातेवाईकांची मंजुरी असल्यास अवयव दान करता येऊ शकते.      

Similar questions