Speech on साहस in Marathi
Answers
*साहस*
*Courage*
माणसाच्या उपजत गुणांपैकी साहस हा गुण आहे. शौर्य ,पराक्रम गाजवणारी माणसं साहसी असतात. साहस हा गुण शक्यतो सैनिकांमध्ये आढळतो कारण देशासाठी आपल्या बंधू-भगिनींचा साठी आपल्या सीमा रक्षणासाठी सदैव तत्पर आणि तयार असतात. साहस हा गुण काही मुलांमध्ये उबजत असतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे साहस शौर्य ,पराक्रम हे मुलांमध्ये दिसून येतं. शौर्य पराक्रम ही साहसाची दुसरी बाजू असेल तरी प्रत्यक्ष हातामध्ये एखाद्या कार्यामध्ये मग्न होऊन ते काम तडीस नेणे जसे की सैन्य, एखादे ऑपरेशन, गिर्यारोहक, वैमानिकांच्या कवायती इत्यादी.
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याकाळी अनेकांनी साहसी प्रयत्न केले होते.
माथेरान ला फिरायला गेलेल्या एका कुटुंबातील काही व्यक्ती एका उंच कड्यावर अशा ठिकाणी अडकले होते की जिथे सामान्य माणसांना पोहोचणे कठीण होते अशा वेळी गिर्यारोहकांच्या सहाय्याने, रोपच्या सहाय्याने त्या दोन माणसांना वाचवण्यात यश मिळवलेला होतं हा त्या गिर्यारोहकांचा सहसाचा प्रकार होता, कारण या साहासमुळे आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो हे सिद्ध होतं.