२) तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश
Answers
Answer:
तैगा प्रदेश:येथील हवामान सूचिपर्णी वृक्षांच्या वाढीस अनुकूल आहे. झाडांची पाने जाड, सुईसारखी अणकुचीदार, अरूंद व स्निग्ध असतात. यामुळे बाष्पोत्सर्जनावर नियंत्रण राखले जाऊन झाडातील पाणी कमी प्रमाणात शोषले जाते. झाडांची खोडे आतून नरम परंतु जाड सालीची असतात. त्यामुळे दहिवरापासून झाडांचे रक्षण होते. झाडांच्या फांद्या जमिनीकडे वाकलेल्या असतात. त्यायोगे हिवाळ्यात पडणारे हिम झाडावरून घसरून खाली पडते. झाड बुंध्याशी मोठे व शेंड्याकडे निमुळते होत गेलेले असते. निमुळत्या शेंड्यामुळे या प्रदेशातील सोसाट्याच्या वाऱ्यापासून झाडे उन्मळून न पडता उभी राहतात. झाडांची फळे शंकाकृती व टणक असतात. त्यावर हवेचा परिणाम मंद गतीने होतो. झाडांची मुळे जमिनीलगत पसरलेली आढळतात. त्यामुळे हिवाळा संपल्यानंतर जेव्हा पृष्ठभागावरील बर्फ वितळते तेव्हा झाडांना लगेच पाणी उपलब्ध होऊ शकते. हिवाळा संपताच वा थोडा प्रकाश मिळताच प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू होते.