तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. In Marathi
Answers
तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा
पारनेर हे माझ्या मामाचे गाव.
एकदा थंडीच्या दिवसात मी मामाकडे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मामाच्या बैलगाडीने आम्ही शेतावर गेलो. मामाने मला ज्या शेतावर नेले ते तुरीचे शेत होते. मी तुरीचे शेत पहिल्यांदाच पाहत होतो. अरलेल्या लोंब्या नारिंगी होत्या. त्या वार्यावर डोलत होत्या. एखाद्या वाऱ्याची झुळूक त्या लोंब्यावरून गेली की एक नारिंगी लहर डूचमळून जात असे. शेताच्या जवळूनच एक ओढा जात होता , तो नेत्र लुप्त करणारा नजरा मला खूप आवडला आणि नारिंगी रंगाचा कुणी सडा घातला की काय असे वाटत होते. तुरीचे शेत खूप सुंदर दिसत होते. मी ते डोळे भरून पाहतच राहिलो. शेतावरून जरा वेळाने मी परतलो पण माझ्या डोळ्यांत ठसलेले तुरीचे शेत जणू नारिंगी धून छेडत माझ्यासोबत येत होते.
Read more on Brainly.in - https://brainly.in/question/11432088#readmore