India Languages, asked by bhaktisarode66, 2 months ago

तुमच्या लहान भावाला चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस मिळाले म्हणून त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Sauron
28

उत्तर :

★ अनौपचारिक पत्र

___________________

(पत्र पाठविणार्‍याचा पत्ता)

दिनांक - 30 ऑक्टोबर, 2021

प्रिय कार्तिक,

कसा आहेस तू? मी इकडे मजेत आहे. तू तिकडे खुशाल आणि स्वस्थ असावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. सकाळीच मला आईचा फोन आला होता.

तिनेच मला सांगितले की, तुला चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. ऐकून अतिशय आनंद झाला. तुझ्या या यशाबद्दल तुझे अभिनंदन.

कार्तिक, मला माहित आहे तुला चित्रकलेची आवड आधीपासूनच आहे आणि चित्रकलेचा छंद जोपासत त्यामध्ये तू अधिकाधिक यश संपादन करावे ही कामना करते आणि ते तू अवश्य करशील हे तर मला माहित आहे. चित्रकलेच्या या कौशल्यांमध्ये तू अधिकाधिक प्रगती करशील हे पण ठाऊक आहे. तुझ्या या अतुलनीय कामगिरीबद्दल बक्षीस स्वरूपात तुझ्यासाठी एक कलर किट पाठवत आहे.

आई आणि बाबा यांना माझा नमस्कार सांग. बाकी सुट्ट्यांमध्ये भेटल्यावर बोलू. पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत

तुझी लाडकी ताई,

गौरी

Similar questions