टीपा लिहा: रेशीम उद्योग
Answers
Answered by
5
★ उत्तर - रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. ' बॉम्बिक्स मोरी ' जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो. मादीने घातलेली अंडी कृत्रिमरीत्या उबवून उबवणीचा काळ कमी करून अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात .त्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो.हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीमकोष तयार करते. या कोषांचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसांपूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे अळी मरते व रेशीमतंतू सैल होतात ते सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions