दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ........... बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.(अ) १२
(ब) १४
(क) १६
(ड) १८
Answers
१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख बँकांचे १४ राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९ जुलै १९६९ मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा,यूनायटेड कमर्शियल बँक ,कॅनडा बँक , देना बँक ,नियन बँक ऑफ इंडिया ,अलाहाबाद बँक , सिंडीकेट बँक ,इंडियन ओवर्सीस बँक,इंडियन बँक,बँक ऑफ महाराष्ट्र या १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे राष्ट्रीयीकरण भारतीय अर्थव्यस्थेचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी होते. जेणेकरून प्रत्येक बँक ही छोट्या छोट्या शहरात , गावात पोहचावी. राष्ट्रीयीकरणामुळे बँकेच्या व्यवस्थेकडून देशाच्या विकासाकरता भरपूर सहाय्य मिळाले आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील उत्तम वेतन चांगले वातावरण त्यांच्या गावातच मिळाले. या सगळ्यामुळे आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला खूप चांगला वेग आलेला आहे,
उत्तर -१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख
१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती.योजना राबवताना आर्थिक टंचाई निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे होते.
प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १९जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.या बँकेंची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१)अलाहाबाद बँक
२)बँक ऑफ बडोदा
३)बँक ऑफ इंडिया
४)बँक ऑफ महाराष्ट्र
५)कॅनरा बँक
६)सेंट्रल बँक ऑफ इंडिया
७)देना बँक
८)इंडियन बँक
९)इंडियन ओव्हरसीज बँक
१०)पंजाब नॅशनल बँक
११)सिंडिकेट बँक
१२)युनायटेड बँक ऑफ इंडिया
१३)युनायटेड कमर्शीयल बँक(युको बँक)
१४)युनियन बँक ऑफ इंडिया.
धन्यवाद...